….नाहीतर काम बंद पाडू! मनसे दिला इशारा

91

पालघर जिल्ह्यातील नांदगाव आलेवाडी येथील रस्त्याचे काम ब-याच दिवसांपासून लांबणीवर गेल्याने, 500 मीटरच्या रस्त्यासाठी 2 महिने पूर्ण होऊनदेखील रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेमध्येच आहे. परिसरात वाहनांची कोंडी होते, तसेच नागरिकांना त्रास होतो आणि अपघातांत वाढ झाल्याने, मनसेचे शाखा अध्यक्ष हर्षल ठाकूर, सतीश सुभाष ठाकूर (शाखा उपाध्यक्ष), मयूर भरत ठाकूर (महाराष्ट्र सैनिक) यांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शनला पत्र लिहून, रस्ते बांधकामात दिरंगाई होण्याबाबत जाब विचारला आहे, तसेच लवकरात लवकर काम पूर्ण केले नाही, तर मनसे हे काम बंद पाडेल, असा इशाराही या पत्रातून जिजाऊ कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे.

पत्राद्वारे मांडली समस्या

मौजे आलेवाडी व नांदगाव तर्फे तारापूर, बोईसर येथे आपल्या व्यवस्थापनामार्फत जे रस्त्याच्या नूतनीकरणाचे मागील दोन महिन्यांपासून काम चालू आहे, ते अतिशय संथगतीने चालू आहे. त्यामुळे आमच्या परिसरातील नागरिकांना रस्ते वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत. असे या पत्राद्वारे मनसेकडून जिजाऊ कन्स्ट्रक्शनला सांगण्यात आले आहे.

Letter

जनता त्रस्त

मागील महिन्यापासून आपल्यामार्फत चालू असलेले काम आजही अपूर्ण अवस्थेमध्येच आहे. ज्या गतीने ते काम चालू आहे, ते पाहता अजून पुढचे दोन महिनेसुद्धा कमीच पडतील असच वाटत आहे. एवढ्या कमी लांबीच्या रस्त्यासाठी एवढा जास्त वेळ लागत आहे, हे आम्ही प्रथमच पाहत आहोत. आपल्या या संथगतीच्या कामामुळे पंचक्रोशीतील जनता त्रस्त झाली आहे. जनतेच्या होणा-या त्रासाला सर्वस्वी जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापन जबाबदार आहे. तसेच या अपूर्ण राहिलेल्या रस्त्यामुळे दररोज वाहनांचे अपघात होऊन, शारिरीक इजा तसेच आर्थिक नुकसान होत आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.

( हेही वाचा: नेहरूंनी स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी गोव्याला पारतंत्र्यात ठेवले! )

…तर व्यवस्थापनच जबाबदार

आम्ही या पत्राद्वारे आपणास सूचना करत आहोत की, जर आपण ते काम जलदगतीने पूर्णत्वास नेले नाही, तर लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते काम बंद पाडेल व त्याचे जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वी जिजाऊ कन्स्ट्रकशनचे व्यवस्थापनच जबाबदार आहे, असा इशारा मनसेने कन्स्ट्रक्शनला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.