पुणे जिल्ह्यात आंबेगावात खासगी शाळेची बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना पुण्यातील घोडेगाव परिसरात घडली आहे. या बसमध्ये एकूण ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षक होते.
( हेही वाचा : मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा – टॅक्सीचा प्रवास महागला, जाणून घ्या नवे दर)
शाळेची बस दरीत कोसळली, ७ विद्यार्थी गंभीर
शैक्षणिक सहलीवरून परत येत असताना हा अपघात झाला आहे. एका तीव्र वळणावर बसचा ताबा सुटला आणि बस दरीत पलटली. दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बरेच विद्यार्थी जखमी झाले असून ७ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जी मुले किरकोळ जखमी झाली आहेत त्यांना उपचारासाठी घोडेगाव आणि मंचर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. दरम्यान पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community