सावकाराच्या जाचाला कंटाळून अधिकाऱ्यानं संपवलं स्वतःचं आयुष्य, चारजण अटकेत

सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील मंगळवार पेठेतील सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने बालाजी हाईट्स या इमारतीतील राहत्या घरी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वयवर्ष ५२ असणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव गणेश शिंदेंनी सुसाईड नोटही लिहीली. यामध्ये सावकाराने पैशासाठी तगादा लावला होता, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.

काय घडला प्रकार

मुंबईहून पुण्यात बदली पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांना पैसै देण्यासाठी गणेश शंकर शिंदे यांनी सावकाराकडून २० ते २५ टक्के व्याजदराने ८४ लाख ५० हजाराचे कर्ज घेतले. त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे दिले, यानंतर त्यांची बदली देखील झाली. परंतु सावकाराने दिलेल्या कर्जाचे हफ्ते शिंदेंनी थकवले होते. हे कर्ज फेडण्यासाठी शिंदेंनी बँकेतून लोन घेण्याची तयारीही केली होती, पण लोन करून देणाऱ्या व्यक्तीने वेळेवर लोन मंजूर करण्यास नकार दिला. यामुळे पैशांची व्यवस्था झाली नाही.

(हेही वाचा – ‘खोके आणि ओके’वरून भिडणारे आमदार एकत्र परदेश दौऱ्यावर)

यादरम्यान, सावकाराने दिलेल्या पैशांसाठी त्याने तगादा लावला आणि फसवणूक झाल्याने वैतागलेल्या सहकार विभागाचे लेखाधिकारी गणेश शिंदे यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेत राहत्या घरी गळफास घेतला. यानंतर शिंदेंच्या पत्नी शोभना यांनी दिलेल्या तक्रारीनंतर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये ७ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यापैकी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे आणि मनीष हाजरा या चौघांना अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here