राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ पुरस्कार जाहीर केले. यामध्ये, शहर स्वच्छतेमध्ये पुण्याला देशात पाचवा क्रमांक मिळाला आहे. परंतु याच पुणे शहरात अलिकडे कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पुण्यात कचरा उचलणाऱ्या गाड्यांची प्रशासनाला कमतरता भासत आहे. शहरात सर्वकाही उत्तम असल्याचा दिखावा प्रशासनाकडून केला जात असला तरी त्याची सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पोलखोल केल्याचे समोर आले आहे.
कचरा प्रश्न गंभीर
कचरा उचलण्यासाठी गाड्या मिळत नसल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात सर्वकाही उत्तम असल्याचा दिखावा प्रशासनाकडून केला जात असला तरी त्याची सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत पोलखोल केली. मोटार वाहन विभागातर्फे विविध कामांसाठी पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेत ठेवण्यात आला. त्यावेळी नगरसेवकांनी कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. शहरात कचरा उचलणाऱ्या गाड्या चार ते पाच महिन्यांपासून बंद आहेत, त्यामुळे कचरा प्रश्न गंभीर झाला आहे. असे नगरसेवकांनी सभेत स्पष्ट केले.
( हेही वाचा : राज्यात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न! )
कचरा गाड्या कमी
मोटार वाहन विभागातर्फे गाड्या भाडे तत्त्वावर घेणे, सुटे भाग, आरटीओचे काम करून घेणे यासाठी पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत ठेवण्यात आला होता. त्यावेळी नगरसेवकांनी या गाड्यांची नादुरूस्ती, अपुऱ्या गाड्यांविषयी चर्चा केली. नादुरुस्त गाड्यांचे स्पेअर पार्ट परदेशातून येतात का? असा प्रश्न यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केला. यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी ३०० गाड्या कमी आहेत, गाड्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, असा खुलासा केला.
Join Our WhatsApp Community