दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना तीन तरूण टाकीत पडले…

100

पुण्यात हवेली तालुक्यात कदमवाकवस्ती येथे दुर्दैवी घटना घडली आहे. शौचालयाची टाकी साफ करताना टाकीत ३ तरुण पडल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे घडली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

( हेही वाचा : मुंबईकरांचे पाणी विजेने पळवले… पुढील काही दिवस पाणी कपातीचे! )

कदमवाकवस्तीत प्यासा हॉटेलच्या पाठिमागे जय मल्हार कृपा ही इमारत आहे. या इमारतीच्या शौचालयाच्या टाकीचे कामकाज सुरू होते. टाकी उपसा करत असताना हे तिघेही खाली पडले आणि त्यात गुदमरून तिघांचाही मृत्यू झाला आहे. यातील एका तरूणाला वाचविण्यात पोलीस आणि अग्निशमक दलाला यश आले होते. या तरूणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परुंतु या तरूणाचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

परिसरात खळबळ

यातील दादा कसबे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. कसबे यांच्यासोबत वाघमारे व इतर एकजन हे काम करत होते. सकाळी काम सुरू केल्यानंतर टाकी उपसण्यात आली. त्यावेळी एकजन टाकीत पडला. त्याला बाहेर काढत असताना हे तिघेही त्यात पडले, अशी माहिती प्राथमिक तपासात प्राप्त झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, गावकऱ्यांनी या परिसरात गर्दी केली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, तपासाला सुरूवात केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.