बुधवारपासून सर्वांनाच मिळणार ‘Corbevax’ चा ‘बुस्टर’

72

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी भारतासह अनेक देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. तर भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस दिली जात आहे. मात्र कोविशिल्ड लसीचा तुटवडा असून केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आता दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्यांना कोर्बेवॅक्स लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. बुधवारपासून (ता. १७) सोलापूर जिल्ह्यातील १३४ केंद्रांवर तो डोस दिला जाणार आहे. पण, तो निर्णय प्रत्येकांसाठी ऐच्छिक असणार आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ‘भाजप’चं ढाक्कुमाक्कुम… ढाक्कुमाकुम..!)

कोरोनाच्या भयावह दोन लाटानंतर कोविशिल्ड, कोवॅक्सिन व कोर्बेवॅक्स या तीन प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी झाला. प्रतिबंधित लसीमुळे मृत्यूचे ताडंव थांबले आणि कोरोना परतीच्या वाटेवर निघाला. लसीकरणामुळे हॉस्पिटलमधील खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर कमी पडण्याची स्थिती पुन्हा उद्भवली नाही. दरम्यान, १८ वर्षांवरील जिल्ह्यातील ३४ लाख १४ हजार ४०० जणांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचणे अपेक्षित होते. परंतु, लसीकरण सुरु होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला, तरीदेखील जिल्ह्यातील चार लाख व्यक्तींनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर अनेकांनी (११.१० लाख व्यक्ती) दुसरा डोस घेतलाच नाही. तरीपण, भविष्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो ही शक्यता गृहित धरून संरक्षित डोस मोफत दिला जात आहे.

कोव्हॅक्सिन अन् कोविशिल्ड घेणाऱ्यांना मिळणार Corbevax

सध्या भारतात नागरिकांना दोन डोस नंतर बूस्टर डोस देखील देण्यास सुरूवात केली असून दोन डोसमधील अंतरही केंद्राने कमी केले आहे. तर ज्यांनी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले असतील आता ते नागरिक कॉर्बेवॅक्स या मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. या सर्वामध्ये आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेणाऱ्यांना बुस्टर डोस म्हणून जैविक ‘ई कॉर्बेवॅक्स लस वापरली जाणार असून, याच्या वापराला केंद्राने परवानगी दिली आहे. हा डोस १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.