महिंद्रा अँड महिंद्राने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १,७०,६८२ लहान व्यावसायिक वाहनांची विक्री केली असल्याची घोषणा केली. मागील आर्थिक वर्षात (२०२१) हाच आकडा १,५१,८८९ होता. कंपनीने तब्बल १२.३७ टक्क्यांची वाढ नोंदवून लहान व्यावसायिक वाहनांच्या विभागात ४०.३ टक्के बाजारपेठ हिस्सेदारी मिळवत आपले नेतृत्वस्थान अढळ राखले आहे.
वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा कणा
लहान व्यावसायिक वाहनांचा विभाग हा वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा कणा आहे, शेवटच्या ग्राहकापर्यंत मालाची वाहतूक करण्याची अतिशय महत्त्वाची सेवा हा विभाग पुरवतो. महिंद्राच्या लहान व्यावसायिक वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची, ०.७ टनांपासून १.७ टनांपर्यंतचे पेलोड असलेली, निवडक ब्रँड्समध्ये डिझेल, गॅसोलीन आणि सीएनजी असे विविध इंधन पर्याय देणारी आणि ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा उदाहरणार्थ, कृषी उत्पादने, दुग्ध उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकामाचे साहित्य, लॉजिस्टिक्स, मस्त्य उत्पादने आणि रोख रकमेची नेआण करणे इत्यादी पुरवणारी वाहने उपलब्ध आहेत.
लहान व्यावसायिक वाहनांच्या विभागाच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष विजय नाक्रा यांनी सांगितले, “गेल्या अनेक वर्षांच्या वाटचालीत आम्ही आमच्या ग्राहकांसोबत दृढ विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. अतिशय मजबूत, अतिशय विश्वसनीय आणि वाहने बाळगण्याचा एकूण खर्च सर्वात कमी असल्याने सर्वात जास्त फायदेशीर उत्पादने तयार करून ग्राहकांना समृद्धी मिळवून दिली आहे. बाजारपेठेतील आमचे नेतृत्वस्थान अढळ राखण्यात मिळालेले यश आमची उत्पादने मौल्यवान असल्याचे प्रमाण आहे आणि मला पक्की खात्री आहे की आम्ही बाजारपेठेच्या अपेक्षांपेक्षा सरस कामगिरी करू व आमचे नेतृत्वस्थान अधिकाधिक बळकट करू.”
(हेही वाचा – मुंबई-पुण्यात CBI चे आठ छापे! व्यवसायिक विनोद गोयंकांसह अविनाश भोसलेंची झडती)
महिंद्राच्या लहान व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये जीतो, सुप्रो, बोलेरो, पिक-अप आणि बोलेरो मॅक्सीट्रक प्लस यांचा समावेश असून पेलोड, पॉवर, कामगिरी आणि कार्गोचा आकार यांच्यानुसार या वाहनांच्या किमती वेगवेगळ्या आणि अतिशय स्पर्धात्मक ठेवण्यात आल्या आहेत. सर्वोत्तम वॉरंटी आणि सर्वोत्कृष्ट मूल्य देणारी वैशिष्ट्ये प्रस्तुत करून महिंद्रा आपल्या ग्राहकांना मनःशांती प्रदान करते. उदाहरणार्थ, सुप्रो प्रॉफिट ट्रक आपल्या विभागात सर्वात जास्त मायलेजसह सर्वात जास्त नफ्याची हमी देतो.
महिंद्राने विक्री व सेवा साहाय्य पुरवणारे एक सर्वात विशाल नेटवर्क उभारले असून देशभरात ४००० पेक्षा जास्त टचपॉइंट्सना ग्राहक महिंद्राची उत्पादने, सेवा मिळवू शकतात. उत्कृष्ट विक्री आणि विक्रीपश्चात सेवा पुरवण्याबरोबरीनेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी स्वतःहून आपल्या ग्राहकांसोबत सतत संपर्कात राहते व त्यांना विविध लाभ मिळवून देते. दहा लाखांचे विमा संरक्षण, ग्राहकांच्या मुलांसाठी मेरीटच्या आधारे शिक्षण शिष्यवृत्ती, आरोग्य विमा याशिवाय ही कंपनी सुरक्षा व स्वच्छता याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी अनेक जागरूकता अभियाने देखील चालवते.
Join Our WhatsApp Community