राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल! जाणून घ्या आजची आकडेवारी

103

बुधवारी राज्यातील विविध भागांतून ७ हजार १४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र वाढत्या डिस्चार्ज संख्येमुळे राज्यात आता केवळ ८२ हजार ८९३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ .०६ % एवढे झाले आहे.

राज्यात आज ९२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्क्यांवर नोंदवला गेला. बुधवारी दिवसभरांत २० हजार २२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख २३ हजार ३८५ झाली आहे. तर आजपर्यंत एकूण ७५ लाख ९३ हजार २९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

जाणून घ्या तपासण्यांचा वेग

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ५९ लाख ५ हजार ६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी केवळ ७८ लाख २३ हजार ३८५ (१०.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७८ हजार ७६ व्यक्ती घरी विलगीकरणात आहेत. तर २ हजार ३९६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

मुंबईत ४४१ बाधित 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४४१ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५१६९९ रुग्ण आढळले. तसेच ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एण मृत्यूची संख्या १६,६६७ एवढी झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.