आयकरच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत गेल्या तीन वर्षाच महाराष्ट्राने तब्बल १२ लाख कोटी रूपयांचा कर भरला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकारी खजिन्यात योगदान देणारे महाराष्ट्र हे देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षामध्ये ३ लाख ८४ हजार २५८ कोटी रुपये, सन २०२०-२१ या वर्षामध्ये ३ लाख ३१ हजार ९६९ कोटी रुपये तर सन २०२१-२२ या वर्षामध्ये ५ लाख २४ हजार ४९८ कोटी रुपये महाराष्ट्रातील नागरिकांनी आयकराच्या माध्यमातून भरले आहेत.
(हेही वाचा – MSRTC: सवलतधारकांची ‘लालपरी’कडे पाठ! तब्बल १,३०० कोटींचे नुकसान)
२०२१ ते २०२२ मध्ये सर्वाधिक करभरणा
गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राने केवळ आयकर म्हणून तब्बल १२ लाख ४० हजार ७२५ कोटी रूपये भरले आहेत. २०१९ ते २०२१ दरम्यान कोरोना महामारी असल्याने कर संकलनात घट झाली असून कोरोना महामारी संपल्यानंतर पुन्हा अर्थचक्र सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा उत्पन्न आणि पर्यायाने कर भरणाही वाढला. तर देशात २०२१ ते २०२२ मध्ये सर्वाधिक करभरणा झाल्याचे दिसून येत आहे.
यादीत इतर कोण?
नवी दिल्ली
- कितव्या क्रमांकावर : दुसऱ्या
- किती कर भरला : ४ लाख ४७ हजार कोटी रुपये
कर्नाटक
- कितव्या क्रमांकावर : तिसऱ्या
- किती कर भरला : ३ लाख ९३ हजार ९०६ कोटी रुपये
तामिळनाडू
- कितव्या क्रमांकावर : चौथ्या
- किती कर भरला : २ लाख १९ हजार ३७० कोटी
गुजरात
- कितव्या क्रमांकावर : पाचव्या
- किती कर भरला : १ लाख ६८ हजार ०२४ कोटी