जानेवारी महिन्यात ५ अवयवदानातून दहा जणांचे आयुष्य बहरले!

153

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटात अवयवदानाची प्रक्रिया मंदावलेली असताचा नव्या वर्षाचा नवा महिना अवयवदान चळवळीसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. जानेवारी महिन्यात पाच अवयवदानामुळे दहा गरजू रुग्णांचे आयुष्य बहरले.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच चार अवयवदान एकामागून एक नोंदवले गेले. पाचही अवयवदानातील वयोगट ४७ पासून ते ७७ वर्षापर्यंत नोंदवला गेला. पाचही अवयवदान प्रक्रियांमध्ये मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी प्राधान्याने पुढाकार घेतल्याची माहिती विविध रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी दिली.

आयुष्य बहरले

यापैकी पाच जणांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवे यकृत मिळाले. यकृत दानाची संख्या सर्वात जास्त नोंदवली गेली. त्याखालोखाल मूत्रपिंडासाठी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील तीन जणांनाही नवे मूत्रपिंड मिळाले. त्याखालोखाल हृदयाचे आणि नेत्रदानामुळेही दोन जणांच्या आयुष्यात नवी संजीवनी मिळाली. परंतु एक फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपणासाठी वापरण्यायोग्य नसल्याने मृत रुग्णाकडून मृत्यूपश्चात अवयव मिळूनही गरजू रुग्णांना मिळाले नाही.

(हेही वाचा – रविंद्र वायकर, राहुल शेवाळेंच्या यादीत आता यशवंत जाधवांना स्थान, कसे ते जाणून घ्या)

अवयवदानाच्या प्रक्रियेत यंदाच्या वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. आतापर्यंत पाच अवयवदान झाले. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार अवयवदान झाले आहेत. अशी माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ एस माथुर यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.