चेंबूरमध्ये सर्व महिलाच महिला, पुरुषांना राहिलीच नाही जागा!

चेंबूर एम पश्चिम विभाग

141

महापालिकेच्या चेंबूर एम पश्चिम विभागात जिथे मागील निवडणुकीत जिथे एकही प्रभाग महिलांकरता आरक्षित नव्हता, तिथे या विभागात नवीन प्रभाग आरक्षणात महिलांचाच जास्त जागा राखीव झाल्या आहेत. मागील निवडणुकीत महिलांसाठी एकही प्रभाग राखीव नव्हता, उलट चार प्रभाग खुले होते. पण नवीन प्रभाग रचनेत एकमेव खुल्ला प्रभाग आरक्षित झाला असून आठ प्रभागांपैंकी पाच प्रभाग हे महिला आरक्षित बनले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक असलेल्या पुरुषांना निवडणूक लढवण्यास जागा शिल्लक राहिल्या नसून आपल्या बायकोला, मुलीला किंवा पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

अतिरिक्त प्रभागाची पडली भर

मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम विभागात भाजपचे चार नगरसेवक असून शिवसेनेचे दोन तर काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. एकूण सात प्रभाग असलेल्या या विभागात अतिरिक्त प्रभागाची भर पडली आहे. भाजपचे महादेव शिगवण, आशा मराठे आणि शिवसेनेचे श्रीकांत शेट्ये यांच्या प्रभागातील काही भाग बाजुला नवीन प्रभागाची रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नवीन प्रभागाचे आरक्षणही महिलाच पडला आहे.

दोघांनाही प्रभागातून हद्पार होण्याची वेळ

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुषम सावंत यांचा आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर या दोघांचे प्रभाग अनुसूचित जातीचे आरक्षित झाले आहे. त्यामुळे दोघांनाही प्रभागातून हद्पार होण्याची वेळ आली आहे. भाजपचे महादेव शिगवण यांचा एकमेव प्रभाग खुला झाला असून या प्रभागावर आता शिवसेनेचे अनिल पाटणकर यांचा डोळा आहे. त्यामुळे जर पाटणकर यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास शिवगण यांच्यासमोर काही प्रमाणात पाटणकर हे आव्हान निर्माण करून शकतात, असे बोलले जाते. तर काँग्रेसच्या संगीता हंडोरे आणि भाजपच्या आशा मराठे यांचे प्रभाग महिला झाल्याने त्या सेफ झोनमध्ये आहेत. तर उपमहापौरपदाची ऑफर असतानाही नाकारणाऱ्या शिवसेनेचे श्रीकांत शेट्ये यांचा प्रभागही आता महिला आरक्षित झाला असून त्यांनाही आता दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

(हेही वाचा – राऊतांकडून आचारसंहितेचं उल्लंघन? कारवाईच्या मागणीसाठी सोमय्या दिल्ली दौऱ्यावर!)

प्रभाग १४९, खुला,(सुषम सावंत, भाजप) नवीन प्रभाग़ १५३,(अनुसूचित जाती)

नवीन प्रभाग रचना : टिळक नगर, इंदिरा नगर झोपडपट्टी, छेडा नगर, पेस्तम सागर कॉलनी,घाटकोपर माहुल रोड

प्रभाग १५० खुला,(संगीता हंडोरे,काँग्रेस) नवीन प्रभाग १५४,(महिला)

नवीन प्रभाग रचना : राहुल नगर, बीएमसी कॉलनी, न्यू गरीब जनता नगर

प्रभाग १५१, खुला,(राजेश फुलवारिया,भाजप) नवीन प्रभाग १५५,(महिला)

नवीन प्रभाग रचना : सहकार नगर, ठक्करबाप्पा कॉलनी वत्सला नाईकनगर,साईबाबा नगर, तानसा पाईप लाईन

प्रभाग १५२, अनुसूचित जाती,(आशा मराठे,भाजप) नवीन प्रभाग १५६,(महिला)

नवीन प्रभाग रचना : सुभाष नगर, जय अंबे नगर, आंबेडकर गार्डन, सेंट अँथोन मार्ग,

प्रभाग १५३, ओबीसी (अनिल पाटणकर,शिवसेना) नवीन प्रभाग १५७,(अनुसूचित जाती)

नवीन प्रभाग रचना : घाटला व्हिलेज,खारदेवनगर, सुभाष नगर पाटीलवाडी,

प्रभाग १५४, खुला,(महादेव शिगवण) नवीन प्रभाग १५८,(खुला)

नवीन प्रभाग रचना : इंदिरा नगर, युनियन पार्क, चेंबूर कॉलनी, नवजीवन सोसायटी, व्हि.एन.पुरव मार्ग

प्रभाग १५५, अनुसूचित जाती,(श्रीकांत शेट्ये,शिवसेना) नवीन प्रभाग १६०,(खुला)

नवीन प्रभाग रचना : म्हैसूर कॉलनी, एच.पी.नगर, भक्तीपार्क, माहुल गाव, भारत पेट्रोलियम रिफायनरी,शिवडी चेंबूर रोड

नवीन प्रभाग क्रमांक १५९, (महिला)

नवीन प्रभाग रचना : सिंधी सोसायटी, मारवली,शहाजीनगर, कलेक्टर कॉलनी, लाल डोंगर रोड व व् व्हि.एन.पुरव मार्गाच्या नाक्यापर्यंत

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.