दिलासादायक! येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होणार, ९ टक्क्यांची घसरण

देशात सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. मात्र वाढत्या महागाईत सामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्याभरात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. खाद्यतेल स्वस्त झाले असून पुढील काही महिन्यांमध्ये खाद्यतेल दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : महिलांच्या नोकऱ्या का जात आहेत? ४ महिन्यात २५ लाख महिलांनी गमावला रोजगार)

येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होणार

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने किमती आता कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम ऑईल आणि नारळ तेलाच्या दरात घसरण झाली आबे. त्याचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर देखील झाला असून, सूर्यफूलाचे तेल वगळता भारतात इतर तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.

मध्यंतरी इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात बंद केली होती मात्र आता पुन्हा एकदा इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे भारतात होणारा तेलाचा पुरवठा वाढला आहे. यामुळे खाद्या तेलाच्या दराच मोठी घसरण झाली आहे, आणि येत्या काळात सुद्धा खाद्यतेलाच्या किमती आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here