LPG गॅस सिलिंडरवरील ‘या’ आकड्यांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? दडली आहे महत्त्वाची माहिती

देशातील अनेक भागात गॅसचा पुरवठा हा पाईपलाईनद्वारे केला जातो, तर देशातील बहुतांश घरांमध्ये LPG गॅस सिलिंडरद्वारेच पोहोचतो. घरी गॅस सिलिंडर पोहोचल्यानंतर सर्वांचे लक्ष त्याच्या वजनाकडे जाते. मात्र सिलिंडरवर असलेल्या आकड्यांकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही. इतकेच नाही तर या कोड नंबरचा अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडरवर लिहिलेल्या या आकड्यांचा अर्थ सांगणार आहोत.

(हेही वाचा – तुम्हाला माहिती आहे का? LPG गॅस कनेक्शन सोबत मिळतो इतक्या लाखांचा विमा)

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, प्रत्येक वस्तूंप्रमाणे गॅस सिलिंडरचीही एक्स्पायरी डेट असते, जी सिलिंडरच लिहिलेली असते. तुम्ही सिलेंडरवर A, B, C आणि D आणि त्यासोबत लिहिलेले काही अंक पाहिले असतील, जसे की A-23, B-24 किंवा C-25. सिलिंडरवर असणारे A, B, C आणि D हे महिन्यांचा संदर्भ दर्शवतात. A- जानेवारी ते मार्च महिना दर्शविते. B म्हणजे एप्रिल ते जून महिना, C म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर असा होतो.

अक्षराच्या पुढे लिहिलेल्या अंकांचा अर्थ काय

A, B, C आणि D या अक्षरांच्या पुढे काही संख्या देखील लिहिलेल्या असतात. हे आकडे सिलिंडरच्या एक्सपायरीचे वर्ष सांगतात. जर तुमच्या गॅस सिलेंडरवर C-23 लिहिलेले असेल, तर त्याचा अर्थ असा की, तुमचे LPG सिलेंडर 2023 मध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान संपणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here