“आरोग्य विभागाची नावे हिंदीसह उर्दूमध्येही लिहा”,असे सांगणा-या अधिका-याचे निलंबन

उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य विभागाच्या एका अधिका-याने प्राथमिक आरोग्य केंद्रांची नावे हिंदीसह उर्दूमध्ये लिहिण्याचे आदेश दिल्याने अधिका-याचे निलंबन करण्यात आले आहे. डाॅ. तबस्सुम खान असे या आरोग्य विभागाच्या अधिका-याचे नाव आहे. ते आरोग्य महासंचालनालयात सहसंचालक प्राथमिक आरोग्य या पदावर होते. डाॅक्टर तबस्सुम खान यांनी युपीमध्ये सर्व आरोग्य विभागांवर हिंदीसह उर्दूमध्ये नावे लिहिण्याचे आदेश दिले होते. तबस्सुम यांनी आदेश काढण्यापूर्वी वरिष्ठ अधिका-यांना विश्वासात घेतले नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे.

डाॅक्टर तबस्सुम खान यांनी राज्यातील सर्व आरोग्य सुविधांनी त्यांच्या आदेशाचे पालन केले की नाही याची खात्री करण्यासाठी सर्व मुख्य वैद्यकीय अधिका-यांना पाहणी करायला सांगितले होते. याबद्दलही खान यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना कल्पना दिली नव्हती. हा प्रकास उघडकीस आल्यानंतर युपी सरकारने त्यांना निलंबित केले आहे. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, डाॅक्टर तबस्सुम खान यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. सरकारी आदेश जारी करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून पाळली जात नव्हती.

( हेही वाचा: गोव्यात राजकीय भूकंप; विरोधी पक्षनेत्यासह 8 आमदार पक्ष सोडणार? )

तक्रारीनंतर खान यांनी उर्दूत लिहिण्याचे दिले होते आदेश 

दरम्यान, उन्नावच्या मोहम्मद हारून यांनी तक्रार केली होती की राज्याची उर्दू ही दुसरी अधिकृत भाषा असूनही अनेक सरकारी विभाग उर्दू वगळत आहेत. या तक्रारीनंतर डाॅक्टर तबस्सुम खान यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला हा आदेश जारी केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here