शाळा, डिजिटल क्लास रुम, बास्केट बॉल, खगोलशास्त्र लॅबचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण!

168

मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थी पटसंख्येत यावर्षी २९ हजारांनी झालेली वाढ ही शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने झाली असल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु विद्यार्थ्यांची वाढ ही सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे प्रतिपादन करत आदित्य ठाकरे यांनी आपले मोठेपण दाखवून दिले.

जोगेश्वरी (पश्चिम ) च्या प्रतिक्षानगर येथील मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण, जोगेश्वरी (पूर्व) च्या पूनमनगर येथील मुंबई पब्लिक स्कूल मधील बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन, दादर (पश्चिम) च्या भवानीशंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन व महापालिका शाळेतील दहावी मधील सर्वोत्तम पंचवीस गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप प्रदान करण्याचा कार्यक्रम तसेच वरळी सी फेस येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील खगोलशास्त्र लॅबचे उद्घघाटन राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.

( हेही वाचा : महापालिका अर्थसंकल्पाचे केवळ फुगेच, मग आवळली जाते हवा! )

सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न

याप्रसंगी बोलतांना कोविड -१९ मुळे दोन वर्षापासून आपण सर्वजण ऑनलाइन शिक्षण घेत होतो. मुंबईकरांची जी काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी निवडणुका आहे म्हणून ती काम करीत नसून आम्हाला जे काही मुंबईकरांना चांगले द्यायचे आहे ते आम्ही करून दाखवित असतो. महापालिका शाळांमध्ये सुद्धा प्रवेशासाठी रांग लागली पाहिजे हे जे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसून येत आहे. हे आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. दंतचिकित्सा, मानसिक आरोग्य, करिअर कौन्सिल, व्हर्च्युअल क्लासरूम या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे हे प्रत्येक मुंबईकरांना वाटले पाहिजे या हेतूने आम्ही सर्वजण काम करीत आहोत. या दृष्टिकोनातून या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी अतिरिक्त ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? तर तुमच्यासाठी ही आहे आनंदाची बातमी )

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, खासदार गजानन कीर्तिकर, स्थानिक आमदार रवींद्र वायकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, आमदार सुनील शिंदे, सभागृह नेता विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, स्थानिक नगरसेविका प्रीती पाटणकर, स्थानिक नगरसेवक अनंत उर्फ बाळा नर, स्थानिक नगरसेवक राजू पेडणेकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.