केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने नवीन रामसर स्थळांची घोषणा केली. रामसर स्थळांच्या यादीत 10 पाणथळ जागांच्या समावेशामुळे भारतात आता 12,50,361 हेक्टर क्षेत्रफळ असलेली एकूण 64 रामसर स्थळे झाली आहेत. या 10 नवीन स्थळांपैकी तामिळनाडूत 6 तर गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशात प्रत्येकी एक स्थळ आहे. या स्थळांच्या निवडीमुळे पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापन तसेच त्यांच्या संसाधनांचा सुज्ञ वापर करण्यात मदत होईल.
( हेही वाचा : फक्त १ रुपयांत करा BEST प्रवास)
रामसर दर्जा म्हणजे?
1971 मध्ये रामसर इराण येथे रामसर करार झाला. त्यावर भारताने 1 फेब्रुवारी 1982 रोजी त्यावर स्वाक्षरी केली. सहभागी देशांनी महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना रामसर स्थळ घोषिक करण्याचे निश्चित करण्यात आले. पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्र किनारे आदी जागांचा समावेश होतो.
रामसर स्थळे म्हणून घोषित नवीन 10 पाणथळ जागा पुढीलप्रमाणे :
- कुंथनकुलम पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
- सातकोसिया घाट, ओडिशा
- नंदा तलाव, गोवा
- मन्नार मरीन बायोस्फीअर रिझर्व्हचे आखात, तामिळनाडू
- रंगनाथिटू बीएस, कर्नाटक
- वेंबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स, तामिळनाडू
- वेल्लोड पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
- सिरपूर वेटलँड, मध्य प्रदेश
- वेदांतंगल पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
- उदयमार्थंडपुरम पक्षी अभयारण्य, तामिळनाडू