प्राप्तिकर विभागाचे पश्चिम बंगाल, झारखंडमधील 28 ठिकाणांवर छापे

136

प्राप्तिकर विभागाने विद्युत पारेषण आणि वितरण (टी अँड डी) संरचना, स्टील स्ट्रक्चर्स, स्टील ईआरडब्लू पाईप्स आणि पॉलिमर उत्पादने इत्यादींच्या निर्मिती करणाऱ्या कोलकाता इथल्या प्रमुख समूहावर छापे घालत जप्तीची कारवाई केली. पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील 28 ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे.

बेहिशेबी रोकड वापरल्याचा पुरावा

(हेही वाचा – गर्भाशयाच्या कर्करोगावरील स्वदेशी लसीची किती असणार किंमत? पुनावाला यांनी दिली माहिती)

संबंधित समूहाने करचुकवेगिरीसाठी अवलंबलेल्या विविध पद्धती छाप्यांदरम्यान उघडकीस आल्या. बोगस खर्च आणि अघोषित रोख विक्रीचे व्यवहार दर्शवणारी कागदपत्रे तसेच डिजिटल डेटाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले आहेत. शिवाय, स्थावर मालमत्ता आणि बेहिशेबी रोख कर्ज इत्यादीसाठी बेहिशेबी रोकड वापरल्याचा पुरावाही सापडला असून रोकड जप्त केली आहे.

250 कोटींपेक्षा पेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न सापडले

जप्त केलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की समूहाने अनेक बोगस कंपन्यांचा वापर त्यांच्या प्रमुख नोंदीसाठी केला आहे. या बोगस संस्थांनी समूहाच्या व्यवसायात भागभांडवल/असुरक्षित कर्जाच्या रुपात बेहिशेबी पैसे परत केले असल्याचे आढळून आले आहे. या व्यतिरिक्त, असंख्य बोगस कंपन्यांच्या वेबद्वारे 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निवासी नोंदी देखील आढळून आल्या आहेत. छापेमारीत आतापर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.