महाराष्ट्रात आयकर विभागाने एकाच वेळी 31 ठिकाणी छापे टाकून 240 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये 6 कोटी रुपये रोख, 5 कोटी रुपयांचे दागिने आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे. पाच दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यांबाबत आयकर विभागाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 5 दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाच्या 175 अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे चाळीस बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टरांच्या घरासह तब्बल 31 ठिकाणी छापे टाकत कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
पाच दिवस टाकले छापे
गोपनीय माहितीच्या आधारे हे छापे सलग पाच दिवस सुरू होते. या सर्वांच्या घरातून आयकर विभागाला बेनामी मालमत्ता, रोख रक्कम, मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्किटे मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत. कारवाई करण्यासाठी २२ गाड्यांमधून १७५ अधिकारी एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले होते. हा छापा अतिशय गोपनीय ठेऊन पुणे, कल्याण, नागपूर येथील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. त्यांच्यासोबत तगडा पोलिस बंदोबस्तही होता.
अधिकृत माहिती दिली नाही
छापेमारीत सापडलेल्या रोकड आणि अन्य बेनामी संपत्तीची गणना करण्यासाठी आयकर विभागाने 12 तास घेतले. या छापेमारीचा आता पर्दाफाश झाला असला तरी प्राप्तिकर विभागाने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
Join Our WhatsApp Community