मुंबईत पाच ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी; बोरिवली, सायनसह झोपडपट्टीतही धाडी

मागच्या दोन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. आता मुंबईतील सायन आणि बोरिवली परिसरात आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सायनमधील एका झोपडपट्टीमध्ये ही छापेमारी सध्या सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. झोपडपट्टीमध्ये छापा मारलेले ठिकाण हे राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी निवडणूक आयोगाची मान्यता नाही. पक्षनिधिच्या नावाखाली करचोरीचा प्रकार आयकर विभागाने उघडकीस आणला आहे. देशभरात अशी कारवाई सुरु आहे.

आयकर विभागाकडून मागील काही दिवसांपासून छापेमारीची कारवाई सुरु आहे. आयकर विभागाने गुरुवारी मुंबईतील सायन परिसरातील एका झोपडीवर छापा मारला आहे. फक्त 100 चौफूट असलेल्या झोपडीवर एका पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय आहे. बॅंक रेकाॅर्डनुसार, या पक्षाला मागील दोन वर्षांत 100 कोटींची देणगी मिळाली होती. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी त्याला निवडणूक आयोगाची परवानगी नाही.

( हेही वाचा: NEET UG-2022 परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातील इतके विद्यार्थी उत्तीर्ण )

पक्षनिधीच्या नावाखाली करचोरी

मिळालेल्या माहितीनुसार, या राजकीय पक्षाने जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी स्वीकारला होता. या निधीसाठी प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रमाणपत्रांचा वापर आयकर सवलत मिळवण्यासाठी केला जातो. पक्षाला मिळालेल्या निधीतून 0.01 टक्के रक्कम कापली जात होती. त्यानंतर ऑडिटने तयार केलेल्या संस्थांमध्ये हा पैसा दिला जात होता.

बोरिवलीतूनही असाच प्रकार समोर आला आहे. बोरिवलीतील एका लहान घरातून एका पक्षाचे कार्यालय संचलित केले जात होते. या पक्षाने विविध व्यक्ती आणि संस्थांकडून 50 कोटींचा निधी घेतला होता. त्यानंतर या पैशांचे वाटप विविध संस्थांमध्ये करण्यात आले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here