मोठी बातमी: राज्यातील कत्तलखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी

राज्यातील कत्तलखान्यांवर मंगळवारपासूनच आयकर विभागाकडून (Income Tax) छापेमारी करण्यात येत आहे. आता गुरुवारीदेखील राज्यातील अनेक कत्तलखाने (Slaughterhouses) आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. मालेगाव (Malegaon) शहरात गुरुवारी पुन्हा एकदा आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मालेगाव, पुणे, भिवंडी, मुंबई, सोलापूर (Malegaon, Pune, Bhiwandi, Mumbai, Solapur) या शहरांसह आयकर विभागाने राज्यभरातील कत्तलखान्यांवर ही कारवाई केली आहे. कत्तखान्यांकडून देण्यात आलेल्या विवरण पत्रात काही त्रूटी असल्याने आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने कत्तलखान्यांवर धाडी टाकल्यानंतर, कारवाई करताना कामगारांना कंपनीतून बाहेर काढले आहे.

( हेही वाचा: मुंबईकरांनो! गुरुवारी मेट्रो सेवा ‘या’ काळात राहणार बंद )

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here