शिवसेनेचा ‘हा’ पदाधिकारी मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेला बुडवणार का?

158

मुंबई महापालिकेसाठी काम करणाऱ्या 35 कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 25 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात आली होती. या सर्व कंत्राटदारांचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्याशी संबंध असल्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे का? असा प्रश्न आता उपस्थितीत होत आहे. जर हे सारे आरोप उघड झाले तर शिवसेनेचा हा पदाधिकारी मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेला बुडवणार हे निश्चित असल्याच्या चर्चा होताना दिसताय.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा टाकून दोन कोटी रुपयांची रोकड जप्त केली, या छाप्यांमध्ये दीड कोटी रुपयांचे दागिनेही जप्त केले आहेत. तपास यंत्रणेची कारवाई इथेच थांबली नाही, तर 25 फेब्रुवारी 2022 रोजी आयकर विभागाने मुंबई महापालिकेसाठी काम करणाऱ्या 35 कंत्राटदारांवरही कारवाई केली.

मुंबईतील एकूण 35 हून अधिक परिसरात छापे

आयकर विभागाने 25 फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंत्राटे घेणारे काही कंत्राटदार, एक प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे सहकारी यांच्याविरोधात शोध मोहीम हाती घेत छापे टाकले. शोध मोहिमेदरम्यान मुंबईतील एकूण 35 हून अधिक परिसरात छापे टाकण्यात आले आहेत. शोध मोहिमेदरम्यान, अनेक संशयित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले असून जप्त करण्यात आले आहेत. हे जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि त्या व्यक्ती मध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. सुमारे 3 डझन स्थावर मालमत्तांचे तपशील सापडले असून त्यांचे मूल्य 130 कोटींरुपयांपेक्षा अधिक आहे. त्यात त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे आणि अवैधरित्या कमावलेले पैसे काही परदेशी अधिकारक्षेत्रात पाठवल्याचे पुरावेही आढळले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फायली देखील सापडल्या आहेत आणि जप्त केल्या आहेत, ज्यांची नोंद खात्याच्या नियमित पुस्तकांमध्ये नाही.

कंत्राटदारांनी 200 कोटींचे उत्पन्न दडवले

कंत्राटदारांच्या बाबतीत, जप्त केलेल्या कागदपत्रांवरून खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडपण्यासाठी त्यांनी अवलंबलेली कार्यपद्धती उघड होते. यासाठी उप-कंत्राट खर्चासाठी जास्त कंपन्या दाखवून पावत्या तयार करणे आणि खोट्या खर्चाचा दावा केला आहे. काही व्यवहारांमधून असे दिसून येते की या कंपन्यांकडून रोख रक्कम काढण्यात आली आहे आणि त्याचा वापर कंत्राटे देण्यासाठी आणि मालमत्तांमधील गुंतवणुकीसाठी बेहिशेबी पैसे देण्यासाठी केला गेला आहे. या गैरप्रकारांद्वारे कंत्राटदारांनी 200 कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. शोध मोहिमेदरम्यान 2 कोटी रुपयांची अघोषित रोख रक्कम आणि दीड कोटी रुपये किमतीचे दागिने आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.