ऑनलाईन गेम करणा-यांची आता यापुढे खैर नाही, असा स्पष्ट इशारा आयकर विभागाने (Income tax department) दिला आहे. त्यामुळे यापुढे ऑनलाईन गेमर्स आयकरच्या रडारवर आले आहेत. 3 वर्षांत 58 हजार कोटी जिंकले आहेत. त्यामुळे आता कर भरा अन्यथा कडक कारवाई होणार, असा इशारा आयकर विभागाने दिला आहे.
गेल्या काही वर्षात अनेक कंपन्यांनी विविध ऑनलाईन गेम्स सादर केले आहेत. तसेच त्या खेळांकडे आकृष्ट करण्यासाठी हे खेळ जिंकणा-या ग्राहकांना घसघसशीत बक्षिसे देण्याची घोषणादेखील करण्यात येत आहे. ऑनलाईन गेम्स प्रकारावर कंपन्यांना जीएसटी भरावा लागतो. तर जे ग्राहक या खेळातून बक्षिसापोटी पैसे मिळवतात. त्या रकमेवर 30 टक्के कराची आकारणी करण्याची तजवीज आयकर कायद्यामध्ये आहे.
( हेही वाचा: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पंचमहाभूते फाउंडेशनद्वारे ‘पर्यावरण विघ्नहर्ता 2022’ स्पर्धेचं आयोजन, बक्षिसेही आहेत हटके )
किती आणि कसा कर भरावा लागेल?
- ऑनलाईन गेमिंगद्वारे मिळालेल्या रकमेवर 30 टक्के कर आाकरणी आहे.
- ज्यांनी नियमित विवरणात याची माहिती दिलेली नाही, अशा लोकांना आता 30 टक्के करासोबत 25 टक्के रक्कम दंडापोटी भरावी लागेल.
- ऑनलाईन गेम खेळणा-या लोकांना आयटीआर- यू- अर्थात आयकराचे अपडेटेड विवरण भरुन त्याद्वारे ऑनलाईन गेमिंगमधून मिळालेल्या पैशाची माहिती द्यावी लागेल. तसेच, अनुषंगिक करभरणा करावा लागेल.