आता क्रेडिट कार्ड आणि UPI द्वारे भरता येणार Income Tax, असा करा वापर

प्रातिनिधीक छायाचित्र

गेल्या दोन वर्षांत आयकर विभागाने आयकर रिटर्न (ITR फाइलिंग) भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आयकर विभागाने फॉर्म दुरुस्त करण्यासाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी एक नवीन पोर्टल देखील तयार केले आहे. या सर्व बदलांशिवाय आयकर विभागाने कर भरण्याची नवीन पद्धतही सुरू केली आहे. आता करदाते UPI आणि क्रेडिट कार्डद्वारेही आपला इन्कम टॅक्स म्हणजेच कर भरू शकतात.

(हेही वाचा – … म्हणून पुणे स्टेशन ते पारगाव PMPML ची बससेवा बंद न करण्याची होतेय मागणी)

आयकर विभागाने सुरू केलेल्या सुविधेअंतर्गत, कोणताही करदाता अधिकृत बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्ड आणि 16 बँकांच्या नेट बँकिंगच्या मदतीने NSDL च्या वेबसाइटवर कर भरू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुमचे या बँकांमध्ये खाते नसेल, तर तुम्हाला कर भरण्यात अडचण येऊ शकते, परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयकर विभागाने सुरू केलेल्या नवीन सुविधेअंतर्गत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग सुविधा, पे-एट-बँक काउंटर, UPI आणि RTGS, NEFT द्वारे तुम्हाला आयकर भरता येणार आहे.

असा भरा UPI आणि क्रेडिट कार्डद्वारे कर

  1. सर्वप्रथम, तुम्हाला लॉगिन आणि पासवर्डने ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागणार आहे.
  2. आता ई फाइल पोर्टलच्या मेनूमधून ई पे टॅक्स पर्याय निवडा आणि नवीन पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
  3. तुम्हाला जो कर भरायचा आहे तो प्रकार निवडून पुढची प्रक्रिया निवडा
  4. आता मूल्यांकन वर्ष निवडा आणि आपण ज्या वर्षासाठी कर भरत आहात ते वर्ष निवडा.
  5. आता तुम्हाला क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग सुविधा, पे-एट-बँक काउंटर, UPI आणि RTGS, NEFT पेमेंट पर्याय दिसतील. यापैकी कोणताही पेमेंट पर्याय निवडून कर भरला जाऊ शकतो.
  6. पेमेंट केल्यानंतर, ई-चलन डाउनलोड करा. आयकर विभाग तुम्हाला मेल आणि एसएमएसद्वारे कर भरला गेल्याची माहिती देईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here