BCC च्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यावेळी येथील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच लंडनमधील बीबीसीच्या मुख्यालयाला छापेमारीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र याबाबत आयकर विभागाने कोणतीही माहिती दिलेली नाही. दिल्लीतील बीबीसीचे ऑफिस पूर्णपणे सील करण्यात आले आहे.
( हेही वाचा : भारताचा ‘हा’ खेळाडू ठरला ICC प्लेअर ऑफ द मंथ!)
बीबीसीच्या कार्यालयांवर छापेमारी
बीबीसीच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी छापा टाकला आहे. दिल्लीतील केजी मार्ग रस्त्यावर बीबीसीचे कार्यालय आहे, तर मुंबईतील बीबीसी कार्यालयामध्येही आयकर विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
काही आठवड्यांपूर्वी बीबीसीने पंतप्रधान मोदी आणि २००२ ची गुजरात दंगल या विषयावर डॉक्युमेंट्री प्रकाशित केली होती. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. फेसबुक, ट्विटरला या बीबीसीच्या डॉक्युमेट्रींची लिंक काढावी असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. बीबीसी ही ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली काम करणारी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असून जगभरातील अनेक देशांमध्ये बीबीसीची कार्यालये आहेत. भारतात बीबीसीचे सर्वात मोठे कार्यालय दिल्ली येथे आहे. हिंदी, तमिळ, मराठी, गुजरातीसह अनेक भाषांमध्ये बीबीसीने विस्तार केला आहे.
Join Our WhatsApp Community