हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल याच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकर विभागाचे मुंजाल आणि कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे पडले आहेत. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. मुंजाल यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे. हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या गुरुग्राममधील निवासस्थानावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी छापे टाकले.
आयकरची कारवाई अद्याप सुरूच
आयकर विभाग मुंजाल आणि कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागेवरही छापे टाकत आहे. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. मुंजाल यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे. हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी 40 हून अधिक देशांमध्ये आपला व्यवसाय करते. हिरो मोटोकॉर्प आशिया, आफ्रिका, अमेरिका यांसारख्या देशांमध्येही आहे. तुम्हाला काही आकड्यांवरून कळू शकते की हिरो मोटोकॉर्पकडे भारतीय टू-व्हीलर सेगमेंटमध्ये खूप मोठी शक्ती आहे.
(हेही वाचा – संजय राऊतांनी टार्गेट केलेल्या नवलानी यांना मुंबई गुन्हे शाखेचं समन्स)
हिरो मोटोकॉर्पचे शेअर घसरले
भारतात विकल्या गेलेल्या सर्व दुचाकींपैकी 50 टक्के हीरो मोटोकॉर्पकडे आहेत. कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार, हिरो मोटोकॉर्पचा एकूण नफा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 36.7 टक्के घसरून 686 कोटी रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, अगदी वर्षभरापूर्वी याच तिमाहीत हिरो मोटोकॉर्प नफा 1084.47 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीने कामकाजातून 7883 कोटी रुपये कमावले होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 9776 कोटी रुपये होते. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 19.4 टक्क्यांची घट झाली आहे. मुंजाल यांच्यावरील इन्कम टॅक्स धाडीच्या वृत्तामुळे शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. कंपनीचे शेअर 2380 रुपयांच्या खाली आले असून नफा 2 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचबरोबर वाहन क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअर्सवरही दबाव आहे. मारुती, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर 1.5 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. हिरो मोटोकॉर्पचे शेअर गेल्या एका आठवड्यात 1 टक्क्यांनी घसरले आहे.
Join Our WhatsApp Community