ITR Last Date: आता ३१ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ व्यक्तींना भरता येणार Income Tax Return

दरवर्षी सर्वांना इनकम टॅक्स रिटर्न भरावे लागते. या प्रक्रियेसाठी सरकारकडून लोकांना वेळही दिला जातो. लोकांना एक निश्चित तारीख देखील सांगितली जाते जेणेकरून लोक त्या तारखेपर्यंत आपले आयकर रिटर्न भरतील. मात्र काही लोक निर्धारित तारखेपर्यंत त्यांचे इनकम टॅक्स रिटर्न भरू शकत नाहीत. अशा लोकांना दंड भरावा लागतो. हा दंड इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) लेट फी म्हणून वसूल केला जातो.

(हेही वाचा – 5G Spectrum लिलाव पूर्ण, या कंपन्या देशात पसरवणार 5G चे जाळे)

आर्थिक वर्ष 2021-22 साठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख रविवार 31 जुलै 2022 होती. म्हणजेच ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांनी या तारखेपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक होते. यासह 31 जुलैपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न दाखल न करणाऱ्या वैयक्तिक आयकरदात्यांचे उत्पन्न करपात्र असल्यास, त्यांना 5000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येणार रिटर्न

पगारदार व्यक्तींना 31 जुलैपर्यंत त्यांचे इनकम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे, तर कॉर्पोरेट किंवा ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे ते मूल्यांकन वर्षाच्या 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांचे इनकम रिटर्न भरू शकतात. अशा परिस्थितीत 31 ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरले तर त्या लोकांना कोणताही दंड भरावा लागणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here