iNCOVACC: जगातील पहिल्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोविड लसीला भारत बायोटेककडून मंजुरी

189

सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडून इन्कोव्हॅक iNCOVACC या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. इन्कोव्हॅक ही कोणत्याही सुईशिवाय नाकातून दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस बनली आहे. या लसीला Intra-Nasal Covid Vaccine असेही म्हटले जाते. भारत बायोटेकने सोमवारी एक अधिकृत ट्विट करून याबाबत माहिती दिली.

(हेही वाचा – आता Online फसवणुकीचं ‘नो टेन्शन’! सरकार आणतंय मोबाईल कॉलिंगबाबत ‘हा’ नवा नियम)

या ट्विटमध्ये एक प्रसिद्धीपत्रक देखील कंपनीने जोडलेले आहे. यामध्ये असे म्हटले की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन CDSCO ने आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रित वापरासाठी असलेल्या सर्व प्रोढांसाठी या लसीचे दोन्ही डोस प्रायमरी सीरिज आणि हेट्रोलगससाठी मंजुरी दिली आहे. याचा अर्थ भारतात 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत या लसीचा डोस दिला जाऊ शकतो.

भारत बायोटेकच्या मते, स्टोरेज आणि वितरणासाठी iNCOVACC 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते. नाकातून दिली जाणारी ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनुसार विशेष डिझाईन आणि विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस विकसित करण्यात आली आहे. तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या लसीची तीन टप्प्यात क्लिनिकल चाचणी करण्यात आली आहे. तसेच ही लस घेणाऱ्या व्यक्तिंच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. तसेच यशस्वी परिणामांनंतर ही लस नाकावाटे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या लशीच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि क्लिनिकल ट्रायलसाठी अंशतः भारत सरकारकडून निधी देण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.