गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. मात्र दिलासादायक म्हणजे देशातील कोरोना बाधितांची संख्या आता अटोक्यात येत आहे, असे असले तरी अद्याप कोरोनाचा धोका अद्याप पूर्णतः कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असला तरी कोरोना चाचण्याही कमी होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना चाचण्या पु्न्हा वाढवण्यासाठी केंद्राकडून आवाहन केलं जात आहे.
(हेही वाचा – एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण कठीण! शरद पवारांचे मत)
कोरोना चाचण्यांचा दर वाढवा
कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर येत आहे, अशा परिस्थितीत बाधितांशी तुलना करता कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी होताना दिसतेय. मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण होत असले तरी काही देशात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचा दर वाढवा, याकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयने मागणी केली आहे.
‘या’ राज्यांना केंद्राकडून पत्र
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रासह नागालॅंड, सिक्किम, केरळ, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि लद्दाखला कोरोना चाचण्या वाढवण्यास भर द्यावा, या आशयाचं पत्र पाठवले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोरोना आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात 10 हजार 949 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 584 वर पोहोचली आहे.
Join Our WhatsApp Community