महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत होणार वाढ

महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय

99

राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यासंदर्भातील बैठक बुधवारी पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ सदस्य व कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. हे लक्षात घेता यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

पर्यांप्त सदस्य संख्या होणार निश्चित

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्यांप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

(हेही वाचा-दोन दिवसात जामीन नाही मिळाला तर आर्यन खानची दिवाळी तुरूंगातच!)

  • महानगरपालिकांमध्ये ३ लाखापेक्षा अधिक व ६ लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ७६ व अधिकत्तम संख्या ९६ पेक्षा अधिक नसेल.
  • ६ लाखापेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व अधिकत्तम संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल.
  • १२ लाखापेक्षा अधिक व १४ लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १२६ व अधिकत्तम संख्या १५६ पेक्षा अधिक नसेल.
  • २४ लाखापेक्षा अधिक व ३० लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व अधिकत्तम संख्या १६८ पेक्षा अधिक नसेल.
  • ३० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व अधिकत्तम संख्या १८५ पेक्षा अधिक नसेल.
  • अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या ४० व अधिक संख्या ७५ हून अधिक नसेल.
  • ब वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २५ व अधिक संख्या ३७ हून अधिक नसेल.
  • क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २० व अधिक संख्या २५ हून अधिक नसेल

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.