बालगुन्हेगारीचे वाढते जाळे !

111

शाळा, महाविद्यालयांमधून अल्पवयीन मुलांचे आयुष्य घडत असते. त्याच वयात मुले गुन्हेगारीच्या मार्गावर वळत आहेत. तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने बलात्कार, हत्या, दरोडा, प्राणघातक हल्ला अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळेच बालगुन्हेगारीला रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. बालगुन्हेगारीत अशीच वाढ होत राहिली तर, तरुणाईचे भविष्य अंधारमय होण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.

गंभीर गुन्ह्यांमध्ये बालकांचा सहभाग

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बालगुन्हेगारी ४७ टक्क्यांनी वाढली आहे, २०१० मध्ये भारतात बालगुन्हेगारीच्या २२ हजार ७४० प्रकरणांवरून २०१४ मध्ये ३३ हजार ५२६ प्रकरणे झाली. २०१९ मध्ये अल्पवयीन मुलांनी केलेल्या २ हजार ३६८ गुन्ह्यांसह राष्ट्रीय राजधानी दिल्ली हॉटस्पॉट होती. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) अहवाल दर्शवितो की, वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांपैकी ३.५ टक्के मुलं बेघर होती. तर, राज्याच्या गुन्हे अहवालातील निष्कर्षानुसार, खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घरफोडी, बलात्कार, दंगल, विनयभंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये १८ वर्षांखालील बालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.

(हेही वाचा : …आता ‘या’ तीन गुन्ह्याचा तपास ‘एनसीबी’चं पथक करणार नाही )

व्यसनांच्या अधीन

व्यसनांच्या अधीन होऊन बालगुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. व्यसनांच्या आमिषाने अलिकडची मुले गुन्हेगारीच्या मार्गावर वळतात. ज्या वयात खेळ, अभ्यास करायचा असतो. त्या वयात अलिकडील पिढी व्यसनांच्या मोहपाशात अडकत आहे. अनेकदा आई-वडील सुद्धा असे गुन्हे करण्यास प्रवृत्त करतात असेही पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. येत्या पिढीला या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाय करण्याची गरज आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.