मुंबईतील कोविड रुग्ण संख्या वाढीला सोमवारी लागला ब्रेक!

82

कोविड रुग्ण वाढीचा वाढता आलेख कायमच असताना रविवारी जिथे ८ हजार ६३ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी दिवसभरात ८०८२ नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दीड ते दोन हजारांनी वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येला सोमवारी ब्रेक लागला आहे.  मात्र यातील ५७४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील ७१ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. त्यामुळे  बाधित रुग्णांची संख्या अधिक असली, तरी रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या आणि त्यातच ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांची संख्या फारच कमी आहे, ही बाब मुंबईकरांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.

मुंबईत रविवारी ४७ हजार ४१० चाचण्या केल्यानंतर ८ हजार ६३ नवीन रुग्ण आढळून आले होते, तर सोमवारी ४९ हजार २८३ चाचण्या केल्यानंतर ८ हजार ०८२ नवीन रुग्ण आढळून आले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या दोन रुग्णांमध्ये एका महिला व पुरुष रुग्णांचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांचे वय हे साठीपार होते. याशिवाय दिवसभरात ६२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये  ३ हजार ७३५ रुग्ण उपचार घेत असून सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजार २७४ एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा १३८ दिवस एवढा आहे.

( हेही वाचा : ग्राहकाने मास्क न लावल्यास दुकानदाराला १० हजारांचा दंड! भाजपने केला विरोध )

मुंबईत रविवारी कंटेन्मेंट झोनमधील झोपडपट्टयांची संख्या ०९ एवढी होती, ती संख्या सोमवारी ११ वर पोहोचली होती, तर रविवारी सीलबंद इमारतींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत २०३ वरून ३१८ वर ही संख्या पोहोचली आहे.

दिवसभरातील रुग्ण संख्या

  • एकूण बाधित रुग्ण : ८०८२
  • बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या : ७,२७३ (९०टक्के)
    सोमवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण : ५७४
  • दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजन बेडवरील रुग्ण संख्या : ७१
  • एकूण दाखल रुग्ण : ३ हजार ७३७
    एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : ३७ हजार २७४
  • एकूण उपलब्ध रुग्ण खाटा : ३० हजार ५६५
  • रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : १२.२ टक्के
  • बरे झालेले रुग्ण : ६२२
    दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या: ०२
  • दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ४९,२८३
    कंटेन्मेंट झोपडपट्टी : ११
    सीलबंद इमारती : ३१८
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.