वातानुकूलित लोकलला वाढता प्रतिसाद

मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी वातानुकूलित उपनगरीय लोकलला उदंड प्रतिसाद दिला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ५ हजार ९३९ होती हाच आकडा मे महिन्यात २६ हजार ८१५ एवढा वाढला आहे.

( हेही वाचा : BEST विषयी काही तक्रार आहे का? घरबसल्या या ठिकाणी संपर्क साधा )

मध्य रेल्वे वातानुकूलित लोकलसह एकूण १ हजार ८१० उपनगरीय सेवा चालवते. दिनांक १४ मे २०२२ पासून मध्य रेल्वेवर १२ वातानुकूलित गाड्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे एकूण वातानुकूलित गाड्यांची संख्या ४४ वरून ५६ झाली आहे, त्यामुळे आता टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवाशांना सुद्धा वातानुकूलित सेवेचा लाभ घेता येत आहे. मध्य रेल्वेने रविवारी आणि नामनिर्देशित सुट्टीच्या दिवशी १४ अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

वातानुकूलित लोकलला प्रचंड प्रतिसाद

तिकीट दरात ५०% कपात केल्यानंतर वातानुकूलित लोकलला मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढला आहे. दिनांक ५ मे २०२२ ते १५ मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेच्या ५ स्थानकांवरील तिकीट विक्री खालीलप्रमाणे

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ८ हजार १७१ तिकिटे
  • डोंबिवली – ७ हजार ५३४ तिकिटे
  • कल्याण – ६ हजार १४८ तिकिटे
  • ठाणे – ५ हजार ८८७ तिकिटे
  • घाटकोपर – ३ हजार ६९८ तिकिटे

प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्याच्या प्रयत्नात मध्य रेल्वे आघाडीवर आहे आणि वातानुकूलित लोकल चालवणे ही त्यापैकीच एक आहे. वातानुकूलित लोकलला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here