Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो ध्वज! काय आहे फरक?

147

भारत सध्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यंदा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान, ‘हर घर तिरंगा’ (प्रत्येक घरात ध्वजारोहण) उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga: ५ राष्ट्रध्वजानंतर ‘तिरंगा’ झाला फायनल, कोणते होते त्यापूर्वीचे झेंडे?)

यंदा देशात ७५ वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करणार असून जनतेला संबोधित करणार आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देशभरात ध्वजारोहण करण्यात येते. पण बऱ्याचदा आपल्याला ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक माहित नाही. तर काही लोकांमध्ये याबाबत संभ्रमही आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला ध्वज जातो, यामध्ये कोणता नेमका फरक असतो हे माहितीये का?

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन काय आहे फरक

आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला तर २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाचे संविधान अस्तित्वात आले. स्वातंत्र्यदिनाला (१५ ऑगस्ट) ध्वजारोहण केले जाते तर प्रजासत्ताकदिनाला (२६ जानेवारी) तिरंगा फडकवला जातो. स्वातंत्र्यदिनाला तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. त्यानंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेत ध्वज फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण हे केले जाते. इंग्रजीमध्ये ध्वजारोहणासाठी Flag Hoisting असे म्हटले जाते. तर प्रजासत्ताकदिनाला ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ उघडून फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जात असते. याला इंग्रजीमध्ये ध्वज फडकावण्यासाठी Flag Unfurling असे म्हटले जाते.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga: घरी तिरंगा फडकवायचाय? मग असा हवा झेंड्याचा आकार)

कोठे आणि कोणाला दिला जातो मान

स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सहभाग दर्शवतात. यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. तर प्रजासत्ताक दिनी आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती ध्वज फडकवतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. यावेळी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. यावेळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करतात. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथावर होतो तर यादिवशी राष्ट्रपतींना ध्वज फडकवण्याचा मान दिला जातो.

(हेही वाचा –  Har Ghar Tiranga: आता दिवस-रात्र ‘तिरंगा’ फडकणार! ध्वज संहितेत मोठा बदल)

कसा साजरा होतो सोहळा

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इतर देशातील प्रमुखांना देखील आमंत्रित केले जाते तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोणत्याही पाहुण्याला आमंत्रित केले जात नाही. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा १५ ऑगस्टच्या दिवशीच संपतो तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप हा २९ जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट (Beating retreat) या समारंभाने केला जातो. तसेच या दिवशी लष्करी सामर्थ्याचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवले जाते. यावेळी देशवासियांसमोर निवडक राज्यांकडून चित्र रथाचं पथ संचालन केले जाते. तर स्वातंत्र्यदिनी कोणताही सोहळा नसतो.

Retreat

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.