Independence Day 2024 : पायाभूत सुविधा क्षेत्रात भारताची कामगिरी नेत्रदीपक; तरीही करण्यासारखे पुष्कळ काही…

104
Independence Day 2024 : पायाभूत सुविधा क्षेत्रात भारताची कामगिरी नेत्रदीपक; तरीही करण्यासारखे पुष्कळ काही...
  • उदय निरगुडकर

पायाभूत सुविधा क्षेत्राचे ६ आधारभूत स्तंभ आहेत. रस्ते, रेल्वे, वीज, जलसंधारण हे त्याचे काही महत्त्वाचे घटक आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात भारत नेत्रदीपक कामगिरी करत आहे. असे असले, तरी अजेंडा हाफ अचिव्ह्ड आहे, असे या बाबतीत आपण म्हणू शकतो. (Independence Day 2024)

देशभर विणले जात आहे रस्त्यांचे जाळे

एखाद्या वस्तूची किंमत किती आहे, हे ठरवताना त्या वस्तूचा वाहतूक खर्च किती होतो, हे महत्त्वाचे असते. जागतिक स्तरावर हा खर्च वस्तूच्या ६ ते ७ टक्के येतो. भारतात हेच दर वस्तूच्या मूळ किंमतीच्या १४ ते १५ टक्के आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करण्यासारखे खूप काही आहे. तरीही सध्या आपण पाहिले, तर देशात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात आहे. रस्तेनिर्मिती केवळ राष्ट्रीय महामार्गांपुरती मर्यादित न राहता भारताच्या सर्वच जिल्ह्यांत, अगदी दुर्गम भागांतही रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. सीमावर्ती भागातही, अगदी सीमेला लागूनही रस्ते निर्माण केले जात आहेत. प्रवास, मालवाहतूक गतीमान होऊ शकेल, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे.

(हेही वाचा – Independence Day: स्वातंत्र्य दिनानिमित्त हाय अलर्ट! दिल्ली, पंजाबमध्ये आत्मघाती हल्ल्याची माहिती)

रेल्वेचे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर

देशात रेल्वेचे जाळे अधिक मजबूत आणि दर्जेदार करण्यावर भर दिला जात आहे. रेल्वेचे विद्युतीकरण, बुलेट ट्रेन आदी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. रेल्वेचे जाळे अधिक सक्षम केल्याने प्रवासी, तसेच मालवाहतूक यांमध्ये सुकरता आणि सुलभता येते. (Independence Day 2024)

ऊर्जानिर्मितीत २०३० पर्यंत कोळशावरचे अवलंबित्व होणार कमी

पायाभूत सुविधांचा विचार करतो, तेव्हा विद्युतनिर्मिती हाही एक महत्त्वाचा घटक समोर येतो. वीजेची दरडोई खपत किती होते आणि किती वीज आपण निर्माण करू शकतो, हे पाहावे लागते. उर्जेच्या पारंपरिक स्रोतांचा आपण पुरेपुर वापर केला आहे. उदा. कोळशापासून वीज निर्मिती करण्याची साधने आपण वापरली आहेत. अर्थात अपारंपरिक उर्जास्रोतांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जात आहे. धरणे उभी राहत आहेत. जलविद्युत प्रकल्पांमध्ये वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गुजरातमधील खांडवा, दक्षिणेतील तुतीकोरिन येथे सौरउर्जा प्रकल्पही जोमाने चालू आहेत. वाऱ्यापासूनही ऊर्जानिर्मिती, म्हणजेच पवनऊर्जाही केली जात आहे. अशा विविध प्रकारच्या ऊर्जानिर्मितीमुळे २०३० पर्यंत आपले ऊर्जानिर्मितीत कोळशावरचे अवलंबित्व कमी होईल. आपले अपारंपरिक इंधन वाढेल. त्यामुळे वीजही स्वस्त होईल.

(हेही वाचा – Independence Day : ‘लाँग वीकेंड’ची पद्धत पहिल्या स्वातंत्र्यदिनापासूनची?)

जलसंधारणासाठी सकारात्मक बदल

पायाभूत सुविधांचा विचार करताना जलसंधारण हा घटकही खूप महत्त्वाचा आहे. यासंदर्भात पुष्कळ गोष्टी करण्यासारख्या आहेत. पावसाचा एक एक थेंब जमिनीत पुन्हा मुरवणे आणि उद्योगांना उपलब्ध करून देणे, यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत. नदीजोड प्रकल्प, पाण्याचे सुयोग्य वितरण यांतही आपण प्रयत्न करत आहोत. जलसंधारण क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सकारात्मक बदल घडवले जात आहेत. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या योजनांतून चांगले प्रयत्न केले जात आहेत. (Independence Day 2024)

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.