Azadi Ka Amrit Mahotsav: खुशखबर! ताज महलसह ‘या’ ऐतिहासिक वास्तूमध्ये मिळणार FREE एन्ट्री!

104

‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त केंद्र सरकारने सर्वसामान्यांना एक खूशखबर दिली आहे. यानुसार, ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय स्मारकांमध्ये नागरिकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, सर्वजण ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरे करताना दिसत आहेत. ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने देशात वेगवेगळ्या पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन पाहायला मिळत आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) देशभरातील संरक्षित स्मारकांमध्ये म्हणजेच ऐतिहासिक वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Indian Railways Rule: देशातील अशी पहिली ट्रेन ज्यामध्ये नॉन व्हेज Not Allowed!)

मिळालेल्या माहितीनुसार, ASI ने जारी केलेला हा आदेश 5 ऑगस्टपासून लागू होणार असून, तो 15 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. ASI चे स्मारक-2 संचालक डॉ. एनके पाठक यांनी सांगितले की, 5 ऑगस्टपासून सर्व स्मारके, संग्रहालये आणि पुरातत्व स्थळांमध्ये पर्यटकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. या सर्व ठिकाणी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. या संदर्भातील माहिती सर्व प्रादेशिक संचालकांना देण्यात आली आहे. देशात 3,600 हून अधिक प्रत्येक अतुलनीय सौंदर्य, इतिहास आणि महत्त्व यांचा अभिमान असणाऱ्या ASI-संरक्षित वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश मिळणार आहे.

150 हेरिटेज स्थळांवर फडकणार तिरंगा

याशिवाय ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने स्वातंत्र्यदिनी भारतातील 150 वारसा स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून 150 केंद्रीय संरक्षित स्मारके, स्थळांवर तिरंगा फडकावला जाणार आहे. यासह भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या एका निवेदनात म्हटले की, देशभरातील 750 स्मारकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.