वीर सावरकरांच्या जन्मस्थळी भगूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

107

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळी भगूर येथे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांच्या हस्ते ध्वजरोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता असून देशातील सर्व नागरिकांनी देशभक्ती अंगीकारणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी प्रतिपादन केले तसेच स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

New Project 16 2

( हेही वाचा : महाराष्ट्र मिलिटरी स्कूल हे राष्ट्रभान जागृत करणारे विद्यापीठ – ग्रुप कॅप्टन निलेश देखणे)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद आंबेकर, तर आभार प्रदर्शन मनोज कुवर यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका स्वाती झुटे, अनिता ढगे, संगीता साळवे तसेच यावेळी भगुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, भूषण कापसे, खंडू रामगडे, योगेश बुरके आदींनी परिश्रम घेतले.

New Project 14 3

New Project 13 4

New Project 15 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.