दिल्लीत 15 ऑगस्टपर्यंत हाय अलर्ट, 10 हजार पोलिसांची फौज तैनात

संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. १० हजाराहून अधिक दिल्ली पोलिसांचे जवान लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी सर्वत्र लक्ष ठेवणार आहे. स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. तर पतंग आणि फुगे उडवणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

(हेही वाचा – Maharashtra Cabinet Expansion: कोट्यधीशांचे मंत्रिमंडळ! कोणत्या मंत्र्याकडे किती संपत्ती?)

त्यामुळे पतंग उडवणाऱ्यांना रोखण्यासाठी ४०० जवान स्वतंत्रपणे तैनात करण्यात आले आहेत. लाल किल्ल्याभोवती असलेल्या उंच इमारती पोलीस ताब्यात घेणार असून त्यावर दिल्ली पोलीस कमांडो आणि नेमबाज तैनात केले जाणार आहे. या इमारती सील करण्यात येणार आहेत. यासह दिल्लीतील रोहिंग्यांच्या वसाहतींवरही नजर ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांचा जमिनीपासून आकाशापर्यंत पहारा असणार आहे. याकरता १० हजाराहून अधिक दिल्ली पोलीस लाल किल्ल्याभोवती आणि त्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तैनात असतील. यावेळी गुप्तचर विभागाकडून कोणत्या प्रकारची माहिती मिळते याकडे लक्ष असून सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून लाल किल्ल्याची सुरक्षा वर्तुळ करण्यात येणार आहे. याशिवाय १ हजारांहून अधिक आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस आयुक्तांनी दिली आहे. या कॅमेऱ्यांमुळे येणाऱ्यांवर नजर राहणार आहे. दिल्ली पोलीस सुरेक्षेसाठी प्रत्येक पाऊल उचलत आहेत. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान, यंदाही पतंग, फुगे, ड्रोन, हलकी विमाने उडवण्यास बंदी असणार आहे. फुगे आणि पतंग रोखण्यासाठी ४०० हून अधिक पतंग पकडणारे जवान तैनात असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here