IndependenceDay2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात निवृत्त नौदल अधिकारी विनायक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

156
IndependenceDay2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात निवृत्त नौदल अधिकारी विनायक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
IndependenceDay2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात निवृत्त नौदल अधिकारी विनायक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यदिन (IndependenceDay2024) साजरा करण्यात आला. सकाळी 8.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला निवृत्त नौदल अधिकारी विनायक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सकाळी 8.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला निवृत्त नौदल अधिकारी विनायक पाटील (Vinayak Patil) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांच्यासह सभासद व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आपल्याला या स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे’
विनायक पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “आजची लहान मुलं हे आपलं उद्याचं भविष्य आहे. उद्या त्यांच्याकडेच आपल्याला जबाबदारी सोपवायची आहे. म्हणून त्यांना याग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. आपली ती जबाबदारी आहे. आपल्या थोर नेत्यांनी केलेल्या क्रांतीमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. हिंसेला प्रतिकार हिंसेनेच केला पाहिजे. क्रांतिकारकांनी बलिदान दिलं म्हणून आपण आज हा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आपल्याला आता या स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे.”

‘शुन्यातून स्वर्ग तयार झालेलं आहे’
“आपल्या शेजारी देशांमध्ये काय घडत आहे? आपल्या देशात काय घडतयं? या समोर उभ्या राहणाऱ्या प्रश्नांना प्रत्त्युत्तर द्यायला आपण भावी पिढी तयार केली पाहिजे. शुन्यातून स्वर्ग तयार झालेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कित्येक वर्षे जेलमध्ये काढली त्या ठिकाणी मला जाण्याचा योग नौदलाने दिला. जेव्हा जेव्हा मी अंदमानला जातो तेव्हा माझा जास्तीत जास्त वेळ तिथे देतो.”

‘हे स्वातंत्र्य टिकवण्याचा भार आपल्यावर आहे’
आपल्याला हे स्वातंत्र्य टिकवायचं आहे, असं सांगताना विनायक पाटील म्हणाले की, “आपण दररोज पेपर वाचतो. त्यात महिलांवर, लहान मुलींवर झालेले बलात्कार पाहुन आजही आमचं रक्त उसळतं. या आरोपींना कठोर शिक्षा तातडीने दिली पाहिजे, का दहा- बारा वर्षे यांना सांभाळायचे? कसाबला सांभाळुन ठेवलं, बिर्याणी खाऊ घातल्या त्या कशासाठी? किती अत्याचार आपण सहन करायचे? मी तिरंग्याखाली शपथ घेतलेली आहे, मी या तिरंग्याचे संरक्षण करत आलो आहे आणि मरेपर्यंत करत राहणार. हे मागितलेलं स्वातंत्र्य नाही, तर आपण मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्याचा भार आपल्यावर आहे.”

‘या देशासाठी जगेन’
“जेव्हा आपल्याकडे पाणबुडी नव्हती तेव्हा पाकिस्तानकडे एक पाणबुडी होती. ती अमेरिकेने प्रशिक्षण देण्यासाठी दिली होती. त्यांचा एक करार होता, की पाणबुडी युद्धात वापरता येणार नाही. ६२च्या युद्धात त्यांना या पाणबुडीचा वापर करता आला नव्हता. ५० वर्षानंतर बनवलेल्या शस्त्रांची नावं अगणित आहेत. सप्टेंबर १९६७ साली पहिल्या चार पाणबुडी विकत घेतल्या, तिथे जास्तीत जास्त सेवा मला देता आली. या मुलांना आपल्याला घडवायचं आहे. प्रत्येकाने शपथ घेऊया, जगेन आणि जगेन तरच फक्त मरेपर्यंत देशासाठी जगेन. या देशासाठी, या भुमीसाठी जगेन.” असे प्रतिपादन विनायक पाटील यांनी केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.