जगभरात सर्वाधिक तरुण असलेला देश म्हणून भारताची ख्याती आहे. मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३’नुसार देशात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतात वृद्धांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दशकांत तरुण देश हे बिरूद हिरावून घेतले जाऊ शकते. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) अहवालात ही माहिती समोर आली. त्यानुसार भारतात अभूतपूर्व वेगाने वाढणारी वृद्धांची लोकसंख्या शतकाच्या मध्यात लहान मुलांच्या संख्येपेक्षा जास्त होईल. भारत हा सध्या तरुण आणि तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.
(हेही वाचा-Baipan Bhari Deva : मिसेस मुख्यमंत्रीही म्हणतात, बाईपण भारी देवा…)
यूएनएफपीच्या ‘इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३’ नुसार राष्ट्रीय स्तरावर लोकसंख्येमध्ये वृद्धांचा (६० हून जास्त) वाटा २०२१ मध्ये १०.१% वरून २०३६ मध्ये १५% आणि २०५० पर्यंत २०.८% पर्यंत वाढेल. शतकाच्या अखेरीस वृद्ध लोकांचा वाटा एकूण लोकसंख्येच्या ३६% असेल. २०१० पासून वृद्ध झपाट्याने वाढ झाली आणि १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे.
बहुतेक दक्षिणेकडील राज्ये आणि हिमाचल आणि पंजाबसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वृद्ध लोकसंख्या २०२१ मध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त होती. येत्या १५ वर्षांत अंतर वाढेल. १९६१ पासून वृद्ध लोकसंख्येत वाढ . १९६१-७१ दरम्यान ते ३२% आणि १९८१-९१ दरम्यान ३१% होते. ते १९९१-२००१ (३५%) वेग वाढला. २०२१-३१ दरम्यान ४१% पर्यंत पोहोचेल.
Join Our WhatsApp Community