भारताला अपलिंकिंग हब बनवण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या उपग्रहांचे अपलिंकिंग एका महिन्याच्या आता नियंत्रणमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी येथील भारतीय अंतराळ परिषदेत केली. तसेच पुढील काही वर्षांमध्ये थेट मोबाईलवर दूरचित्रवाणी वाहिन्यांचे थेट प्रसारण शक्य होणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.
अपलिंकिंगच्या नियंत्रणमुक्तीमुळे भारत एक केंद्र म्हणून उदयास येऊ शकेल
चंद्रा म्हणाले की, मोबाईलवर टीव्ही सामग्रीचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने प्रसारभारती आणि आयआयटी कानपूर संशोधन करीत आहोत. यामुळे स्पेक्ट्रमचा प्रभावी वापर सुनिश्चित होईल. दोन- तीन वर्षांत थेट मोबाईलवर प्रसारण ही एक वास्तविकता असू शकते, असा विश्वास चंद्रा यांनी व्यक्त केला. सध्या मोबाईलवर अॅपच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दिसते. देशातील 562 वाहिन्या त्यांच्या सेवांच्या अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंगसाठी परदेशी उपग्रहांचा वापर करतात. यासाठी सिंगापूरचा हब म्हणून वापर होतो. अपलिंकिंगच्या नियंत्रणमुक्तीमुळे भारत एक केंद्र म्हणून उदयास येऊ शकेल, असा विश्वास चंद्रा यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा: राज्यात भाजपची सत्ता येण्यास राष्ट्रवादी कारणीभूत; पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप )
Join Our WhatsApp Community