…म्हणून इराणच्या ‘किवी’वर भारतात बंदी!

120

भारतात मध्य पूर्वेच्या देशांकडून येणा-या फळांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. इतकेच नाही तर तेथील फळंसुद्धा कीटकग्रस्त असतात. त्यासाठी भारताने संबंधीत देशांना वारंवार चेतावणी देऊनही काही फरक न पडल्याने, भारताने आता इराणमधून येणा-या ताज्या किवी फळांची आयात स्थगित केली आहे, असे केंद्रिय कृषी मंत्रालयाने सांगितले.

वारंवार दिली गेली चेतावणी 

इराणच्या ताज्या किवी फळांच्या आयातीवर कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत नोडल बॉडी नॅशनल प्लांट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (NPPO) ने 7 डिसेंबरपासून बंदी घातली आहे. इराणद्वारे ताज्या किवी फळांसाठी 8 डिसेंबर, 2021 पासून जारी केलेली फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रे आमच्याकडून स्वीकारली जाणार नाहीत, असे मंत्रालयाने एनपीपीओमधील आपल्या इराणी समकक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. भारताला इराणमधून येणा-या फळांमध्ये कीटक ‘एस्पिडियोटस नेटिल’ आणि दोन किवी फळांच्या मालामध्ये ‘स्यूडोकोक्कू कॅलसेओलारिया’ कीटकनाशके आढळली, असे  भारताला ऑक्‍टोबर 2021 पासून, आतापर्यंतच्या आलेल्या फळांच्या कंटेनरमधील 22 कंटेनरमध्ये आढळल्याचे भारताने आपल्या पत्रात म्हटले आहे.

म्हणून आयातीवर स्थगिती

भारताने ठरवून दिलेल्या गुणवत्तेच्या निकषांचे पालन होत नसल्याने भारताने कारवाई करण्याची वारंवार चेतावणी देऊनही इराणमधून किवी फळांच्या कीटकग्रस्त खेपांमध्ये वाढ झाली आहे, असे त्यात म्हटले आहे. याआधी 2019 मध्येही भारताने इराणमधून आलेल्या किवी फळांच्या 13 खेपांमधून ‘एस्पिडियोटस नेटिल’ नावाचे कीटक आणि कीड याबाबात चेतावणी दिली होती. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, या कीटकग्रस्त किवी फळांच्या पुरवठ्याबाबत सतत इराणला चेतावणी दिली होती, तसेत फळांची योग्य ती तपासणी करण्याचेही सांगण्यात आले होते. पण इराणकडून मात्र कोणतीही अॅक्शन घेतली गेली नाही. असे या पत्रात सांगण्यात आले आहे. या कीटकांमुळे भारताच्या जैवसुरक्षेला धोका आहे, त्यामुळे भारतीय नियमांच्या तरतुदींनुसार त्यावर कारवाई केली जाते.

 ( हेही वाचा: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला! दोन जवान हुतात्मा, १२ गंभीर जखमी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.