नाकाद्वारे दिली जाणारी इन्कोव्हॅट ही कोरोना प्रतिबंधात्मक लस गुरुवारी बाजारात आलीय. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने ही लस विकसित केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ही लस वितरित करण्यात आली. इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे. इंग्रजीमध्ये या लशीला इंट्रा-नॅसल कोविड वॅक्सिन म्हटले जाते.
भारत बायोटेकने विकसित केलेली ही लस सरकारी रुग्णालयामध्ये ३२५ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ८०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. या कंपनीला डिसेंबर २०२२मध्ये, प्राथमिक २-डोस शेड्यूलसाठी आणि हेटरोलॉगस बूस्टर डोस म्हणून मान्यता मिळाली होती. त्याआधी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ)ने १८ आणि त्यावरील वयोगटातील आपत्कालीन परिस्थितीत इंट्रानासल लसीचा वापर करण्यास मान्यता दिली होती. स्टोरेज आणि वितरणासाठी इन्कोव्हॅक लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते. नाकातून दिली जाणारी ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनुसार खास डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस विकसित करण्यात आली आहे.
भारत बायोटेकची इन्कोव्हॅक या इंट्रानेझल कोविड-१९ लसीचा पर्याय कोविन ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खासगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होणार आहे. नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे नाकाद्वारे देण्यात येणारी कोरोना लस आहे. नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना सुईची भीती वाटते. अशा लोकांसाठी नोझल कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्तम पर्याय आहे.
(हेही वाचा – इस्रोचा पराक्रम; यान कधीही बनणार क्षेपणास्त्र)
Join Our WhatsApp Community