Gaganyaan Spaceflight Mission: मानवाला अंतराळात पाठवण्याचे भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

भारताने तंत्रज्ञानामध्ये फार मोठी प्रगती केली आहे. आंतराळ मोहिमेत सुद्धा भारताने मोठी क्रांती केली आहे. आता मानवाला अंतराळात पाठवायचे भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण गगनयान आपल्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 2022 या वर्षासाठी सरकारने मानवी अंतराळ उड्डाणाची योजना आखली होती. त्यानुसार गगनयान या आंतराळ यानाची पहिली चाचणी ही 2022 च्या शेवटी होणार आहे. या चचणीनंतर अंतराळातील व्योम मित्रा हा ह्युमनॉइड रोबोट पुढील वर्षी बाह्य अवकाशात पाठवण्यात येईल, अशी माहिती सिंह यांनी दिली आहे.

2024 मध्ये मोहीम येणार सत्यात

मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी संभाव्य चालक म्हणून चार लढाऊ वैमानिकांची निवड केली होती. या वैमानिकांनी रशियामध्ये विशएष प्रशिक्षण घेतले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO)दोन कक्षीय चाचणी उड्डाणांच्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर 2024 मध्ये दोन अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवेल, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

(हेही वाचाः ‘या’ 26 औषधांमुळे होऊ शकतात कॅन्सरसारखे आजार,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली यादी)

अशी होणार चाचणी

या चाचणी मोहिमेदरम्यान अंतराळयान 15 किमी.उंचीवर प्रक्षेपित केले जाईल. या चाचणीदरम्यान पॅराशूट वापरुन क्रू कॅप्सूल पृथ्वीवर परत येण्याची खात्री करण्यासाठी परिस्थितीची पाहणी करतील, असे सांगण्यात येत आहे. 2018 साली पंतप्रधान मोदींनी या अंतराळ मोहिमेसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here