दरवर्षीच्या तुलनेत यंदा देशात गव्हाचे उत्पन्न चांगले झालेय. भारतात आगामी 1 एप्रिल 2023 रोजी सुमारे 80 लाख मेट्रीक टन गहू शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात वर्षभर पुरेल इतका गहू साठा असल्याची माहिती अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी दिली.
आत्तापर्यंत 40 एलएमटी गहू निर्यातीसाठी करारबद्ध
देशात यावर्षी 1 हजार 50 लाख मेट्रीक टन गव्हाचे उत्पादन अपेक्षित आहे. केंद्र सरकार सध्या गव्हाची निर्यात करत आहे. गहू निर्यात रोखण्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. आत्तापर्यंत 40 एलएमटी गहू निर्यातीसाठी करारबद्ध झाला आहे. एप्रिल 2022 मध्ये सुमारे 11 एलएमटी गहू निर्यात करण्यात आला आहे. इजिप्त आणि तुर्कीने देखील भारतीय गहू आयात करण्यास मान्यता दिली होती. जूनपासून अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियातील गहू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गहू विकण्याची हीच योग्य वेळ आहे.
(हेही वाचा – आगामी 20 दिवसांसाठी 1100 पॅसेंजर गाड्या केल्या रद्द)
शेतकऱ्यांच्या गव्हाला चांगला भाव
बाजारभाव जास्त असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात गहू खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे हमीभावापेक्षा जास्त जास्त दराने गव्हाची खरेदी केली जात आहे. किमान आधारभूत किंमत, जी शेतकऱ्यांसाठी चांगली होती., त्यापेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळतोय. यावर्षी बाजारभावात झालेली वाढ, तसेच देशांतर्गत असलेली मागणी आणि निर्यातीसाठी खासगी कंपन्यांची असलेली जास्त मागणी यामुळे सरकारी एजन्सीची खरेदी कमी आहे. सध्या शेतकऱ्यांच्या गव्हाला चांगला भाव मिळत आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडे सरकारला गहू विकण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत आहेत. खासगी बाजारामुळे सरकारी खरेदी कमी झाली असल्याचे पांडे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community