लसीकरणात भारत बनला महासत्ता!

भारताने एका दिवसात ८.५७ दशलक्ष जणांचे लसीकरण केले.

कोरोना ही जागतिक महामारी असून दीड वर्षांपासून प्रगत देशांनी यापुढे हात टेकले आहे. यावर प्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव उपाय समोर आल्यानंतरही बलाढ्य विकसित देशांना तेवढ्या जलदगतीने लसीकरण करता येत नाही, मात्र भारताने ही किमया साध्य करून दाखवली आहे. जगातील १८ बलाढ्य देशांनी मिळून एका दिवसात सरासरी ८.१७ दशलक्ष जणांचे लसीकरण केले, तर भारताने एका दिवसात ८.५७ दशलक्ष जणांचे लसीकरण करून लसीकरणात भारतच महासत्ता आहे, हे दाखवून दिले आहे.

या देशांना टाकेल मागे!

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, यूके, कॅनडा, अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, सौदी अरेबिया, टर्की, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि स्वित्झर्लंड या सर्व देशांमध्ये मिळून एका दिवसात जेवढे लसीकरण होते, त्याही पेक्षा अधिक लसीकरण भारतात एका दिवसात होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला सर्वाधिक फटका बसला, आता कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच देशातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. भारतात आतापर्यंत ७६ कोटी ५७ लाख १७ हजार १३७ डोस देण्यात आले आहेत.

(हेही वाचा : आधी सोनूवर टीका, आता पाठिंबा! शिवसेनेची दुहेरी भूमिका)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here