रविवार ७ जानेवारी रोजी संध्याकाळी भारत आणि मालदीव (India Maldives conflict) या दोन देशांमध्ये वाद सुरु झाले. मालदीवच्या एका मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख इस्त्रायलचे दूत असा केल्याची बातमी सगळीकडे पसरली. मालदीवच्या आणखी दोन मंत्र्यांनीही त्याला जोडून भारताविरुद्ध हिंदूविरोधी टिप्पणी केली.
अशातच आता मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू (India Maldives conflict) यांनी भारताला बेट राष्ट्रातून आपले सैन्य मागे घेण्याची मुदत दिली आहे. मालदीवच्या राष्ट्रपतींनी सांगितले की, भारतीय लष्करी जवानांनी १५ मार्चपर्यंत देश सोडला पाहिजे. मोहम्मद मुइझू यांनी आपल्या पहिल्या चीन दौऱ्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : धार्मिक स्थळे, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर आणि मालदीवच्या (India Maldives conflict) मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पणी नंतर भारत – मालदीव यांच्यातील राजनैतिक वाद उफाळून आला आहे. दरम्यान मालदीवच्या राष्ट्रपतींनी “आम्ही लहान असू शकतो परंतु आम्हाला धमकावण्याचा अधिकार कोणाकडेही नाही” असे विधान केले आहे. या विधानातून त्यांनी भारताला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
भारतीय सैन्य माघारी घेणे हे मुइझूचे एक प्रमुख निवडणूक वचन –
मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “भारतीय लष्करी (India Maldives conflict) कर्मचारी मालदीवमध्ये राहू शकत नाहीत. राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइझू आणि या प्रशासनाचे हे धोरण आहे.” तसेच मिळालेल्या माहितीनुसार, मालदीवचे सध्याचे राष्ट्रपती हे त्यांच्या ‘इंडिया आउट “मोहिमेद्वारे सत्तेवर आले. मालदीवमधून भारतीय सैन्य माघारी घेणे हे मुइझूचे एक प्रमुख निवडणूक वचन होते.
(हेही वाचा – Manoj Jarange : आंदोलनापूर्वीच बच्चू कडू मनोज जरांगेच्या भेटीला; नक्की काय आहे या मागचे कारण?)
भारत – मालदीवमध्ये उच्चस्तरीय बैठक –
या सर्व पार्श्वभूमीवर म्हणजेच लष्कर मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी मालदीव आणि भारताने उच्चस्तरीय गट तयार केला. या गटाची रविवार १४ जानेवारी रोजी सकाळी माले येथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयात पहिली (India Maldives conflict) बैठक झाली. या बैठकीला भारतीय उच्चायुक्त मुनु महावर उपस्थित होते. १५ मार्चपर्यंत सैन्य मागे घेण्याची विनंती हा बैठकीचा मुख्य विषय होता. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी मालदीवचे अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मोईझू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी कर्मचारी माघारी बोलावण्याची औपचारिक विनंती भारताकडे केली होती.
काय आहे ‘बॉयकॉट मालदीव’ ट्रेंड ?
त्यानंतर भारतात ‘बॉयकॉट मालदीव’ (Boycott Maldives) हा ट्रेंड जोर धरू लागला. अनेक भारतीयांनी सोशल मीडियावर आपण आपली मालदीव सहल रद्द केल्याचे संदेश टाकायलाही सुरुवात केली. राजकीय पातळीवर तर दोन्ही देशांमध्ये (India Maldives conflict) बोलणी सुरू झालीच, शिवाय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मालदीवला जाण्याऐवजी भारतातील लक्षद्वीप सारख्या किनारपट्टीवर फिरायला जा असे सांगितले. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो वायरल केले.
(हेही वाचा – Accident : दुचाकी आणि स्कॉर्पिओच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षिक जागीच ठार)
चीनधार्जिणे मुइज्जू –
मुइज्जू हे चीनधार्जिणे (India Maldives conflict) आहेत हे सर्वाना माहित आहेच. अशातच भारतासोबत सुरु असलेल्या या वादादरम्यान मुइज्जू यांनी नुकतीच चीनवारी केली. यावेळी त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. एकीकडे भारताबरोबरचे संबंध ताणले (India Maldives conflict) गेले असताना मुइज्जू यांनी चीनचा दौऱ्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community