आंध्र प्रदेशातील एलुरु येथील अक्कीरेड्डीगुडेम येथे बुधवारी रात्री एका रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले. नायट्रिक अॅसिड मोनोमिथाइलच्या गळतीनंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
बुधवारी रात्री झाला स्फोट
#AndhraPradesh– Six dead and 12 injured after a fire broke out in a Chemical unit ( Porus Industries) in Eluru’s Akkireddigudem. The unit makes powders which are used to make polymers, says SP Rahul Dev. Incident occurred in ground floor where there is a reactor …) (contd..) pic.twitter.com/xNAtU9YEa7
— Rishika Sadam (@RishikaSadam) April 14, 2022
गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी विजयवाडा येथे पाठवण्यात आले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोरस इंडस्ट्रीच्या युनिट 4 मध्ये रात्री 11:30 वाजता स्फोट झाला, त्यानंतर मोठी आग लागली. त्यावेळी कारखान्यात सुमारे दीडशे लोक काम करत होते.
मृतांना मदत जाहीर
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
#UPDATE | As per CM & Governor's statements, a total of 13 people injured & 6 dead in the accident
Andhra Pradesh Governor Biswabhusan Harichandan also expressed anguish over the fire accident at the chemical factory in Eluru; extended condolences to the bereaved families
— ANI (@ANI) April 14, 2022
अद्याप कारण अस्पष्ट
ही दुर्घटना नेमकी का घडली यामागचे कारण शोधले जात आहे. रिएक्टरमध्ये स्फोट झाला की शाॅर्ट सर्किट याचा अधिकारी तपास करत आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
Join Our WhatsApp Community