देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी देशात पहिल्यांदा समुद्रतळाशी बोगदा उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वांद्रे-कुर्ला काॅम्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडने यासाठी निविदा मागवल्या आहेत. समुद्राच्या तळाशी बांधण्यात येणारा हा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामधील सात किलोमीटर भुयारी मार्ग समुद्राच्या तळाशी असेल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे काॅर्पोरेशनने यासाठी टेंडरही मागवले आहेत.
असा असणार भुयारी मार्ग
बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. समुद्राखालील सात किलोमीटर लांबीचा बोगदा हा देशातील समुद्राखाली बांधला जाणारा पहिला बोगदा असेल. निविदेतील कागदपत्रांनुसार, टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरुन बोगदा बांधण्यात येणार आहे. देशातला समुद्राखालील पहिला भुयारी मार्ग मुंबईत होणार आहे. बुलेट ट्रेनच्या समुद्राखालील काढण्यात येणा-या भुयारी मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. BKC ते शिळफाटा दरम्यान सात किलोमीटरचा हा बोगदा समुद्राखालून जाणार आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात एकूण 21 किमीचा भुयारी मार्ग असेल. त्यातला सात किलोमीटरचा मार्ग समुद्राखालून जाईल. पारसिक टेकडीखाली 114 मीटर खाली हा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.
( हेही वाचा: शी जिनपिंग नजरकैदीत, चीनमध्ये घडणार सत्तांतर? )
Join Our WhatsApp Community