भारत-पाकिस्तान फाळणीत वेगळे झाले भाऊ, 74 वर्षांनी भेटले आणि…

1947 ला भारताला स्वातंत्र्य तर मिळाले, पण सोबतच भारतासारख्या विशाल देशाच्या वाट्याला आली फाळणीसारखी सतत ताजी आणि त्रासदायक ठरणारी जखम. या फाळणी दरम्यान, अनेक कुटुंबं एकमेकांपासून दूर झाली. काही जण फाळणीतून तयार झालेल्या पाकिस्तानात गेले तर काही भारतात राहिले. त्यामुळे अनेक नाती दुरावली गेली. याच फाळणीतून दुरावलेल्या भावांची तब्बल 74 वर्षांनी भेट झाली. इतक्या वर्षांनी भेट झाल्यानंतर दोघे एकमेकांना बिलगून हमसून हमसून रडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तब्बल 74 वर्षांनी झाली भेट

कर्तारपूर कॉरिडोरमध्ये या दोन भावांची भेट झाली. देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळी हबीब उर्फ शेला आणि सिद्दीक नावाचे हे दोन भाऊ अगदीच लहान होते. भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळी सिद्दीक आपल्या परिवारासह भारतातून पाकिस्तानात गेले तर त्यांचे मोठे बंधू हबीब हे भारतात राहिले. आता तब्बल 74 वर्षांनी हे दोन भाऊ पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताशी जोडणाऱ्या कर्तारपूर कॉरिडोरमध्ये पुन्हा भेटले.

( हेही वाचा: मलाही देशी दारुचा परवाना द्या, विद्यार्थ्याचं थेट शिक्षणमंत्र्याना निवेदन! )

सरकारचे मानले आभार

हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. या दोन भावांपैकी सिद्दीक पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये राहतात तर हबीब उर्फ शेला हे पंजाबमध्ये राहतात. इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडताना दिसले.फाळणीच्या वेळी सिद्दीक हे आपल्या आईसह फुलेवाला इथं गेले होते, तर भटिंडामध्ये एका दंगलीनंतर सिद्दीक आणि त्यांच्या परिवाराला पाकिस्तानमध्ये जावं लागलं.आता 74 वर्षांनी दोघांना एकमेकांबद्दल कशीबशी माहिती मिळाली आणि त्यांची भेट झाली. या भेटीनंतर दोघांनी दोन्ही देशांच्या सरकारांचे आभार मानले आहेत. हबीब यांना भारतातून पाकिस्तानात पाच किलोमीटर दूर कर्तारपूर गुरुद्वारापर्यंत मोफत व्हिसा मुक्त सुविधा देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here