India-Pakistan War : १६ डिसेंबरला मिळवला होता भारताने पाकिस्तानवर विजय… जाणून घेऊया संक्षिप्त इतिहास

60
India-Pakistan War : १६ डिसेंबरला मिळवला होता भारताने पाकिस्तानवर विजय... जाणून घेऊया संक्षिप्त इतिहास

१९७१ सालचं भारत आणि पाकिस्तान युद्ध हे तिसरं भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध म्हणून ओळखलं जातं. हे युद्ध म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक लष्करी संघर्ष होता. हा संघर्ष पूर्व पाकिस्तान येथे बांगलादेशच्या मुक्ती युद्धादरम्यान म्हणजेच ३ डिसेंबर १९७१ सालापासून ते १९ डिसेंबर १९७१ या दिवसापर्यंत सुरू राहिला होता. (India-Pakistan War)

युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने केलेल्या ऑपरेशन चेंगीझ खानमध्ये आठ भारतीय हवाई स्थानकांवर हवाई हल्ले करण्यात आले होते. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यांमुळे भारताने पाकिस्तानच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यानंतर भारतीय सैन्याने बंगाली राष्ट्रवादी सैन्याच्या बाजूने पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये प्रवेश केला. (India-Pakistan War)

(हेही वाचा – सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी; Pradhanmantri Sangrahalaya ने पाठवले पत्र)

पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानच्या या युद्धामध्ये भारताने प्रवेश केल्यामुळे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही आघाड्यांवर असलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यामधल्या आधीपासूनच सुरू असलेल्या संघर्षाचा आणखी विस्तार झाला. (India-Pakistan War)

युद्ध सुरू झाल्यानंतर तेरा दिवसांनी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि पाकिस्तानने शरणागती पत्करली. पाकिस्तानी सैन्याच्या पूर्व कमांडने ढाका या ठिकाणी १६ डिसेंबर १९७१ साली शरणागतीच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर बांग्लादेश हे नवीन राष्ट्र म्हणून उदयाला आलं. (India-Pakistan War)

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : रोहित शर्माच्या नकारात्मक नेतृत्वावर रवी शास्त्री यांची टीका)

त्यावेळी अंदाजे ९३,००० पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सैन्याने कैद केलं होतं. त्यामध्ये पाकिस्तानशी एकनिष्ठ असलेल्या काही बंगाली सैनिकांसोबतच पाकिस्तान सशस्त्र दलाचे ७९,६७६ ते ८१.००० गणवेशधारी कर्मचारी होते. उर्वरित १०,३००३४ ते १२०० कैदी हे सामान्य नागरीक होते. (India-Pakistan War)

मात्र आता बांगलादेश भारताचे उपकार विसरला आहे आणि आता तिथल्या हिंदूंवर अत्याचार करत आहेत व भारताला नेस्तनाबूत करण्याच्या वल्गना करत आहे. म्हणूनच आता पुन्हा एकदा युद्ध व्हायला हवं. १९७१ ला बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी युद्ध झालं होतं. आता बांगलादेशमधील जिहादी नष्ट करण्यासाठी युद्ध व्हायला हवं. (India-Pakistan War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.